प्राचीन काळापासून मुलतानी मातीचा वापर सौंदर्यासाठी केला जात आहे. हल्ली बाजारात मुलतानी पावडर देखील मिळते जी फेसपॅकसारखी चेहऱ्यावर लावली जाते. या मातीत असणाऱ्या घटकांमुळे त्वचेवरील डाग तसेच वांग कमी होण्यास मदत होते. तसेच जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्वचेचा तेलकटपणाही यामुळे कमी होतो.
मुलतानी मातीचा असा करा वापर
- त्वचेचा तेलकटपणा दूर करण्यासाठी
ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी मुलतानी माती वरदान आहे. या प्रकारची त्वचा असणाऱ्यांनी मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी, तुळशीची पाने किंवा रस आणि एक चिमटी हळद हे एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्याला लावावी आणि वाळल्यानंतर लगेच धुवून टाकावे. यामुळे चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो. हा पॅक 15 दिवसातून एकदा लावावा.
- त्वचेवरील डाग घालवण्यासाठी
अनेकदा पुटकुळ्या येऊन गेल्यावर त्याचे डाग चेहऱ्यावर तसेच राहतात. अशावेळी मुलतानी मातीमध्ये टोमॅटोचा रस, चंदन पावडर मिक्स करुन पॅक तयार करा आणि चेहऱ्याला लावावा. यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होईल.
- कोरड्या त्वचेसाठी
मुलतानी मातीमध्ये बदाम आणि दुधाचे प्रमाण जास्त घालावे तसेच एक चिमट चंदन पावडर घालावी यामुळे त्वचेतील रुक्षता कमी होऊन त्वचा सुंदर दिसते.
- कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी
कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी मुलतानी मातीत दूध आणि बदामाची पूड मिक्स करून पॅक करा. या प्रकारच्या पॅकमुळे त्वचा तेलकट आणि कोरडी देखील होत नाही दोन्ही गोष्टींचा समतोल राखला जातो.
हेही वाचा :