लग्न हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीयुक्त टप्पा असतो. हे एक असे नाते असते ज्यात दोन लोक संपूर्ण आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत बांधले जातात आणि सात जन्मांकरता हे नाते निभावण्याचे वचन एकमेकांना देतात. लग्न हा एक सुंदर प्रवास आहे. या प्रवासात आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषकरुन जर तुमचं लग्न एका अशा मुलाशी झालं असेल जो त्याच्या आईच्या खूप जवळ आहे. अनेकदा अशा मुलांमुळे काही समस्यांना तोंड द्यावं लागतं. सध्याच्या जगात याप्रकारच्या मुलांना मम्माज बॉय असं म्हटलं जातं.
असे पुरुष जे आपल्या आईच्या खूप जवळ असतात ते कोणताही निर्णय घेण्यासाठी आपल्या आईवर जास्त अवलंबून असतात. ते बऱ्याचदा आपल्या आईचंच म्हणणं ऐकतात. ज्यामुळे नाराजीची भावना निर्माण होते. किंवा लग्नात वा नात्यामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. यासाठीच जाणून घेऊयात काही अशा टिप्स ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मम्माज बॉय असलेल्या पतीसोबतचे नाते नीट सांभाळू शकाल.
तुमचे निर्णय स्वत: घ्या :
असं होऊ शकतं की लग्नाआधी तुमची सासू तुमच्या पतीसाठी काही निर्णय घेत असेल. परंतु लग्नानंतर हे गरजेचे आहे की तुमचा पती आता प्रौढ आहे आणि त्याने स्वत:च्या गोष्टी त्याने स्वत: मॅनेज करायला शिकायला हव्यात. तुमच्या पतीला समजवा की स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला हवेत आणि प्रत्येक मतभेदांमध्ये आईला सहभागी करून घ्यायची गरज नाही. नाहीतर यामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकते.
मर्यादा आखा :
जरी तुमचा पती तुमच्या आईवर अवलंबून असला तरी लग्नानंतर तुम्हाला त्याला हे स्पष्ट सांगायला हवे की त्यांना आता नात्याची मर्यादा राखता यायला हवी. इतर व्यक्तींना दोघांच्या आयुष्याबाबतच्या निर्णयात कितपत समाविष्ट करून घ्यायचे हे कळायला हवे. तुमचा जोडीदार कदाचित तुमच्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करेल. पण तुम्ही तुमच्या मतांवर ठाम रहायला हवे.
तुमच्या सासूसोबत होणाऱ्या भांडणापासून वाचा :
नवऱ्याशी जास्त जवळीक कोणाची या विषयावरून तुमच्या सासूशी भांडू नका. असं केल्याने तुमचे पतीसोबत असणारे नाते बिघडू शकते. याऐवजी तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत खूप मॅच्युरिटीने चर्चा करायला हवी. अशी कोणतीही चर्चा करू नका ज्यामुळे वाद वाढू शकतील. याशिवाय तुमचे नाते अधिक मजबूत करण्यासाठी तुम्ही अधूनमधून डिनरला जाऊ शकता किंवा एकत्र वेळ घालवू शकता.
नात्यात अंतर बनण्यापासून वाचा :
तु्म्हाला या गोष्टीचा स्वीकार करायला हवा की तुमची सासू ही तुमच्या नवऱ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण आणि जवळची व्यक्ती आहे. त्यामुळे तुम्हीदेखील तुमच्या सासूसोबत एक छान नाते तयार करायला हवे. वेळोवेळी त्यांचा सल्ला घ्यायला हवा. अजून चांगल्या प्रकारच्या बॉन्डिंगसाठी तुम्ही त्यांना डिनरला घेऊन जाऊ शकता. किंवा त्यांच्यासोबत सुट्टीचा प्लॅनही करू शकता.
हेही वाचा : Nose Ring : नथ नाकाच्या डाव्या बाजूलाच का घालतात?