प्रत्येकाला आपले घर सुंदर, आकर्षक असावे असे वाटते. यासाठी घरातील फर्निचर, घराचा रंग या सर्व गोष्टी विचार करुन खरेदी केल्या जातात. विशेष करून घराला रंग देताना जास्त काळजी घेण्यात येते. परफेक्ट रंगामुळे घराला एक नवा लुक मिळतो. हल्ली बरेचजण घराला रंग देण्याऐवजी म्यूरल वॉलपेपरचा वापर करतात. म्युरल वॉलपेपरमुळे घराला मॉडर्न लुक येतो. याशिवाय म्यूरल वॉलपेपर खिशाला परवडणारा देखील असतो.
म्यूरल वॉलपेपर –
- घराला रंग देण्याऐवजी हल्ली म्यूरल वॉलपेपर लावले जातात. भिंतींना वॉलपेपर लावण्यास जास्त वेळ लागत नसल्याने कामाचा व्याप होत नाही. त्यामुळे घराला रंग न देता पेपर लावतात. म्यूरल वॉलपेपर मोठ्यामोठ्या डिझाइन्स असतात. ज्यामुळे रुम खूपच आकर्षक दिसतात.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे म्यूरल वॉलपेपर तुम्हाला कस्टमाइज करून घेता येतात. तुमच्या घराला जशी थिम असेल त्याप्रमाणे कस्टमाइज करून मिळतात. तुम्ही हे वॉलपेपर वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने खरेदी करू शकता.
- म्यूरल वॉलपेपरमध्ये विविध डिझाइन्स तुम्हाला मिळतील. यात निसर्गापासून ते अॅबस्ट्रॅक्ट डिझाइन्सपर्यत सर्व डिझाइन्स तुम्हाला मिळतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाइन निवडू शकता.
- म्यूरल वॉलपेपरमुळे घराचा लूक बदलतो. तुम्ही लिव्हिंग रूम, बेडरूम वॉशरूममध्ये म्यूरल वॉलपेपर लावू शकता.
म्यूरल वॉलपेपरचे प्रकार –
म्यूरल वॉलपेपरमध्ये तुम्ही निसर्ग, सिटीस्केप, अॅबस्ट्रॅक्ट ते आर्ट डिझाइन्सची निवड करू शकता. याशिवायही बरेच ऑपश्न तुम्हाला मिळतील.
निसर्गाशी संबंधित डिझाइन – यामध्ये तुम्हाला जंगल, नदी, समुद्र, पर्वत आणि फूलांमध्ये व्हरायटी मिळेल.
सिटीस्केप – यात तुम्हाला शहरांतील प्रमुख ठिकाणे आणि उंचच उंच इमारती दिसतील.
अॅबस्ट्रॅक्ट – अॅबस्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला भौमितिक आकारांचे डिझाइन मिळतील.
आर्ट डिझाइन – आर्ट डिझाइन प्रकारात सेलिब्रिटी फोटोस्, प्राण्यांची चित्रे, देवीदेवतांच्या प्रतिमा मिळू शकतात.
किंमत –
म्यूरल वॉलपेपर खिशाला परवडणारा असतो. घराच्या भिंतीसाठी तुम्हाला 1000 ते 2000 रुपयांपर्यत खर्च येतो. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने हे वॉलपेपर खरेदी करू शकता.
हेही पाहा –