Friday, June 9, 2023
घर मानिनी Health मसल्स आणि मूड दोघांसाठी बेस्ट आहे Music workout

मसल्स आणि मूड दोघांसाठी बेस्ट आहे Music workout

Subscribe

शारिरीक हालचाल आणि व्यायाम आपल्याला नेहमीच तंदुरुस्त ठेवतात. त्याचसोबत आपल्या मस्तिष्क आरोग्यासाठी सुद्धा फार गरजेचे असते. विचार करणे, शिकणे, एखाद्या समस्येवर तोडगा काढणे अथवा भावनिक संतुलन राखण्यास फिजिकल अॅक्टिव्हिटी आपली फार मदत करतात. काही शोध असे सांगतात की, यामुळे तुमच्या बुद्धिमत्तेत सुधारणा होते. तसेच चिंता, टेंन्शन दूर होते. नियमित शारिरीक हालचाल केल्यास डिमेंशियासह अन्य आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. यामधील सर्वाधिक प्रभावशाली अॅक्टिव्हिटी म्हणजे डान्स करणे. परंतु तुम्हाला माहितेय का डान्स केल्याने मसल्स आणि मूड ही उत्तम राहतो. याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

ब्रेन हेल्थ मजबूत होण्यास मदत
अभ्यासातून असे समोर आले आहे की, एखाद्या फिटनेस गुरुच्या मदतीने तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याला मजबूत करणारी एखादी अॅक्टिव्हिटी करा.

- Advertisement -

डोक आणि शरिर स्वस्थ राहते
प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य फिट राहण्यासाठी डान्स करणे फार फायदेशीर ठरु शकते. डान्स ही अशी एक अॅक्टिव्हिटी आहे जी तुम्ही नियमित जरी केलात तरीही तुम्हाला मानसिक आनंद देते.

न्यू ब्रेन सेल्स बनण्यासाठी फायदेशीर
फिजिकल अॅक्टिव्हिटी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही माध्यमातून स्मरणशक्ती आणि विचार करण्यास मदत करते. यामुळ मस्तिष्क कोशिका स्वस्थ राहण्यास ही मदत होते. तसेच न्यू ब्रेन सेल्स बनण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे.

- Advertisement -

आठवड्यातून ५ दिवस तरी डान्स करा…
हार्वर्ड हेल्थ जर्नलनुसार, तरुणांनी आठवड्यातून कमीत कमी १५० मिनिटे तरी मध्यम स्वरुपाची शारिरीक हालचाल केली पाहिजे. यासाठी डान्स करणे हा बेस्ट पर्याय आहे. मध्यम स्वरुपाच्या या अॅक्टिव्हिटीमध्ये दिवसातील ३० मिनटे, आठवड्यातील ५ दिवस काढा. तर ६५ वर्षावरील किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींनी आठवड्यातील जवळजवळ तीन दिवस कोणतीही अॅक्टिव्हिटी करु शकता.


हेही वाचा- Sitting job मुळे होतोय सायटीकाचा त्रास

- Advertisment -

Manini