आपल्यापैकी अनेकांना समोसा खायला खूप आवडतो. मात्र प्रत्येकवेळी आपण बटाट्याचा समोसा खातो, पण या वेळी तुम्ही चविष्ट आणि पौष्टिक असा पनीर समोसा नक्की ट्राय करा.
साहित्य :
- 125 ग्रॅम पनीर (बारीक चिरलेले)
- 1/2 कांदा (बारीक चिरलेला)
- 1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
- 1/2 चमचा लाल तिखट
- 1/2 चमचा लिंबाचा रस
- 1 कप मैदा
- 1/4 चमचा जिरे
- बटर
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
कृती :
- सर्वप्रथम एक भांड्यात मैदा, बटर आणि मीठ, पाणी घालून एकत्र करून पीठ घट्ट मळून घ्या.
- हे पीठ मळून झाल्यानंतर ओल्या सुती कापडाने ते झाकूण ठेवा.
- आता एका कढईत मध्यम आचेवर थोडे तेल गरम करा. आता त्यात सुरूवातीला जिरे,कांदा, हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या.
- आता त्यामध्ये लाल तिखट, मीठ आणि पनीर घाला. हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून एक मिनिट शिजू घ्या. त्यानंतर गॅस बंद करा.
- एकीकडे कणकेची बारीक पुरी लाटून घ्या आणि त्या पुरीचे मधून दोन भाग करा.
- या अर्ध्या भागात तयार सारण भरून त्याला समोश्यासारखा आकार द्या आणि हे तेलात खरपूस तळून घ्या.
- पनीर समोसा पुदीण्याची चटणी किंवा टोमॅटो सोबत गरमागरम सर्व्ह करा.