Saturday, March 15, 2025
HomeमानिनीRecipeMutton Recipe : असं बनवा घाटी स्टाईल झणझणीत मटण

Mutton Recipe : असं बनवा घाटी स्टाईल झणझणीत मटण

Subscribe

मटण, चिकन खायला सर्वांनाच आवडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घाटी स्टाईल झणझणीत मटण कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 1 किलो मटण
  • 4 कांदे
  • 200 ग्रॅम सुकं खोबरं
  • आलं-लसूण
  • गरम मसाला
  • 1 चमचा हळद
  • मीठ चवीनुसार
  • कढीपत्ता
  • 3 चमचे घाटी मसाला

कृती :

Telugu Style Mutton Koora (Goat Curry) : r/spicy

 

  • सर्वप्रथम मटणाला हळद-मीठ लावून मसाला होईपर्यंत बाजूला ठेवा.
  • तोपर्यंत दुसरीकडे कढईत खोबरं तांबूस भाजून ठेवा. नंतर 2 कांदे कापून भाजून घ्या, ते गार करून त्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या, आलं, हळद, मीठ घालून बारीक पेस्ट करा.
  • नंतर कुकरमध्ये तेल घालून बारीक चिरलेला कांदा घाला आणि तांबूस होईपर्यंत परतून घ्या. त्यात दीड चमचा घाटी मसाला घालून परतून घ्या.
  • नंतर त्यात कढीपत्ता, चवीनुसार गरम मसाला आणि मसाला पेस्ट घालून परत परतून घ्या.
  • आता त्यात हळद-मीठ लावून ठेवलेले मटण घाला आणि मसाला एकजीव होईपर्यंत परता आणि पाणी घालून चार शिट्या काढा.

हेही वाचा :

Recipe : चटपटीत कोळंबी भजी

Manini