काही महिलांनी कितीही प्रयत्न केला तरीही त्यांची नखं वाढली जात नाही. अशातच दुसऱ्या महिलांच्या नखांकडे पाहून त्यांना आपल्या नखांबद्दल निराशा वाटते. त्यामुळे त्या इंटरनेटवर व्हायरल होणारे काही ट्रिक्स, टीप्स पाहून त्या ट्राय करण्यास सुरुवात करतात. मात्र रिजल्ट तर शून्य येते.
अशी बहुतांश लोक तुम्हाला भेटतील जी नखं वाढवण्यासाठी मीठाच्या पाण्याचा वापर करण्याचा सल्ला देतात. परंतु खरंच असे केल्याने नखं वाढतात का? याच बद्दल आणि नखं ही घरगुती उपायांनी कशी वाढवाल याच बद्दलची ट्रिक आपण पाहणार आहोत.
नखं ही एका महिन्यात जवळजवळ 0.14 इंचांपर्यंत वाढतात. तर पायांची नखं 0.0063 इंचांपर्यंत होतात. बोटांची नखं पुन्हा वाढण्यासाठी 3-6 महिन्याचा वेळ लागतो. तर पायांची नखं 12-18 महिन्यात वाढली जातात. नखांचा विकास हा तुमच्या खाण्यापिण्यावर अवलंबून असतो.
नारळाचे तेल
एका वाटीत नारळाचे तेल घेऊन त्याने बोटांना मसाज करा. गोलाकार गतिने मसाज केल्याने रक्त प्रवाह सुधारला जातो. त्याचसोबत नखं वाढण्यास मदत ही होते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही असे करून पाहू शकता.
ऑलिव्ह ऑइल
कोमट ऑलिव्ह ऑइलने आपल्या नखांना मसाज केल्याने नखं वाढू शकतात. रात्रीच्या वेळेस लावून तुम्ही सकाळी नखं स्वच्छ धुवू शकता.
लिंबूचा रस
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे नखांच्या विकासासाठी उत्तम असते. नखांवर लिंबू लावल्याने नखांवरील डाग निघतात. दररोज पाच मिनिटे जरी मसाज केल्यास तुमची नखं स्वच्छ होतीलच पण वाढण्यास ही मदत होईल.
हेही वाचा- Foot care in monsoon: पावसाळ्यात पायांची अशी घ्या काळजी