नखं सुंदर दिसण्यासाठी बहुतांश महिला नेल पॉलिशचा वापर करतात. मात्र बहुतांशवेळा असे होते की, नेलपेंच अधिक लावल्याने नखांचे सौंदर्य आणि चमक फिकी होते. त्यामुळे नेल पॉलिश व्यवस्थितीत कशी लावावी याच बद्दलच्या काही खास टीप्स पाहणार आहोत. त्याचसोबत नेलपॉलिश लावण्यापूर्वी आणि नंतर काय करावे हे सुद्धा जाणून घेऊयात.
-नवी नेल पॉलिश लावण्यापूर्वी नेहमीच आधीची नेल पॉलिश काढा, त्यासाठी नॉन एसिटोन रिमूवरचा वापर करावा. कारण एसिटोन असणाऱ्या रिमूवरमुळे नखांची चमक निघून जाते आणि ड्राइनेस येतो.
-जेव्हा नेल पॉलिश काढाल तेव्हा नखांना बदामाचे तेल, नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइलने मसाज करा. जवळजवळ अर्धा तास तरी नखांना हे तेल राहू द्या.
-नेलपेंट नेहमीच उत्तम क्वालिटीची असावी. जेणेकरुन ती दीर्घकाळ टिकेल आणि नखांना नुकसान ही पोहचवणार नाही.
-नेलपेंट लगेच नखांना लावू नका. आधी बेसकोट लावा आणि नंतर नेलपेंट अप्लाय करा. बेसकोट न लावल्याने नखांची चमक दूर होते. नखं पिवळी होतात.
-नेलपेंट सुंदर दिसण्यासाठी नेहमीच दोन कोट लावा. यापूर्वी नेलपेंटचा एक कोट सुकू द्या. त्यानंतर दुसरा कोट अप्लाय करा.
-नेलपेंट नेहमीच नखांच्या डायरेक्शननुसार अप्लाय करावी. यामुळे त्याचा रंग ही उठून दिसतो.
-नेलपेंट लावताना काहीवेळेस ती नखांबाहेर लागली जाते. त्यामुळे नखांच्या किनाऱ्यावर वॅलसिन जेली लावा.
-नेलपेंट लावण्यासाठी कमीत कमी 24 तास हात हे गरम पाण्यात टाकू नका. यामुळे नेलपेंट खराब होऊ शकते.