Sunday, March 16, 2025
HomeमानिनीNational Cancer Awareness Day : कॅन्सरशी लढणाऱ्या योद्धांसाठी 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस'

National Cancer Awareness Day : कॅन्सरशी लढणाऱ्या योद्धांसाठी ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस’

Subscribe

दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस’ साजरा केला जातो. कर्करोगाची कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार याविषयी लोकांना माहिती देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. कर्करोगामुळे दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडतात, त्यापैकी स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळतो, तर पुर:स्थ कर्करोग हा पुरुषांमधील सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे.

राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस कधी सुरू झाला

2014 मध्ये, आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे भारतात कर्करोगाचे वाढते प्रमाण. या प्राणघातक आजाराला वेळीच पकडण्याची गरज ओळखून या दिवसाची सुरुवात करण्यात आली. या दिवसाच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे तर, नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञ मादाम क्युरी यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो, जेणेकरून कर्करोगाशी लढा देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान लक्षात ठेवता येईल.

कर्करोगाचा धोका

आपण आपली जीवनशैली सुधारली तरी कर्करोगाचा धोका बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. असे कर्करोग तज्ञांचे म्हणणे आहे. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की वाढत्या वयानुसार कर्करोगाचा धोका वाढतो, पण लहान मुलेदेखील त्याचा बळी होऊ शकतात. याशिवाय, धूम्रपान, जास्त वजन, आहारातील व्यत्यय, शारीरिक निष्क्रियता यासारख्या जीवनशैलीतील घटकदेखील कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.

कर्करोगाचा उपचार कसा शक्य

  • त्वचा, कोलन, गर्भाशयाचा आणि स्तनाचा कर्करोग यासारख्या कर्करोगाच्या विविध प्रकारांसाठी नियमित स्व-तपासणी आणि स्क्रीनिंग केल्याने लवकर निदान होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कर्करोगातून बरे होण्याची शक्यताही अनेक पटींनी वाढते.
  • जर आपण कर्करोगाबद्दल बोललो तर, जर आपण हा रोग वेळेत ओळखला तर उपचार करणे शक्य होते, कर्करोग व्यक्तीच्या शरीरात किती पसरला आहे आणि तो कोणत्या टप्प्यावर आहे यावर अवलंबून आहे.
  • केमोथेरपी, हार्मोन थेरपी, इम्युनोथेरपी, रेडिएशन थेरपी इत्यादी उपचार पर्याय कर्करोगाच्या उपचारात वापरले जातात.
  • कर्करोगावरील उपचार पद्धती ही रुग्णाच्या आरोग्यावर आणि त्याचा कौटुंबिक इतिहास काय आहे यावरही अवलंबून असते. कर्करोग सुरुवातीलाच पकडला गेला तर तो सहज बरा होऊ शकतो.
  • एचपीव्ही लस अनेक प्रकारचे कर्करोग टाळू शकते. यासोबतच हिपॅटायटीस बी लसीमुळे यकृताचा कर्करोग टाळता येऊ शकतो.

Edited By : Nikita Shinde

Manini