आपल्या देशात दरवर्षी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्यात येतो. देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. लोकांना सुरक्षिततेबद्दल जागरूक करण्यासाठी आठवडाभर राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. 4 मार्चपासून राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने लोकांना केवळ देशाच्या शत्रुंपासूनच नाही तर विविध रोगांपासूनही सुरक्षित राहण्यासाठी जागरूक केले जाते.
इतिहास –
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची (NSC) 4 मार्च 1966 रोजी स्थापना झाली. या स्थापनेपासून व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्यविषयी सार्वजनिक जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो. NSCची स्थापना झाल्यानंतर एका दशकानंतर हा कार्यक्रम सुरु झाला. कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रचार करणे, अपघात टाळणे आणि सुरक्षित तसेच निरोगी कामाचे वातावरण निर्माण करणे ही NSCची मुख्य उद्दिष्टे आहेत. कामाची ठिकाणे सुरक्षित आणि आरोग्यदायी बनवण्यात कामगार आणि सरकार काय भूमिका बजावतात यावर भर देण्याची संधी राष्ट्रीय सुरक्षा दिवस येते.
राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे महत्त्व –
अपघात कोठेही आणि कुठेही होऊ शकतो. पण, खबरदारी घेतल्यास किंवा थोडी जागरूकता दाखवल्यास होणारे अपघात टाळता येतात. वास्तविक, राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे उद्दिष्ट सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षिततेबद्दल जागरूकता पसरवणे आणि अपघात कमी करणे आहे. या सप्ताहात प्रत्येक क्षेत्रातील लोकांना सुरक्षिततेशी संबंधित समस्या आणि औद्योगिक अपघात टाळण्याचे मार्ग आणि त्यामुळे होणारे नुकसान सांगितले आहे.
2025 ची थीम –
राष्ट्रीय सुरक्षा दिवस यंदाची थीम “विकसित भारतासाठी सुरक्षितता आणि कल्याण महत्त्वपूर्ण अशी आहे.
हेही वाचा –