Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर लाईफस्टाईल NationalEggDay2021:अंडी खा तंदुरुस्त राहा,सुदृढ आरोग्याकरीता अंड्याचे महत्व जाणून घ्या

NationalEggDay2021:अंडी खा तंदुरुस्त राहा,सुदृढ आरोग्याकरीता अंड्याचे महत्व जाणून घ्या

जीवनसत्व ड अंड्यात जास्त प्रमाणात आढळले जाते. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

Related Story

- Advertisement -

शरीराच्या उत्तम अरोग्यासाठी अंडी किती फायदेशीर आहेत हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. यापासून होणार्‍या आरोग्य आणि सौंदर्याचे लाभ याची चर्चा नेहमीच होताना दिसते. आज जागतिक अंडा दिवस आहे (National egg day) यानिमित्त अंड्याबद्दल महत्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहोत. प्रोटीन व्यतिरिक्त अंड्यामध्ये आढळणारे पोषक  तत्व आणि त्यापासून होणारे फायदे यांच्याबद्दल आज चर्चा करणार आहोत.

अंड्यातील पिवळ्या बलक आणि पांढर्‍यामध्ये प्रत्येकी 3 ग्रॅम प्रथिने असतात. या दोघांमधील फरक हा कॅलरींच्या संख्येमध्ये आहे. अंड्याच्या अंड्यातील पिवळ्या बलक मध्ये 60 कॅलरीज असतात. आणि पांढर्‍यामध्ये 15 कॅलरीजपेक्षा आढळतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपणास समानप्रमाणात पोषकद्रव्ये मिळतात

- Advertisement -

reasons not to store eggs in the refrigerator
तुम्हीही अंडी फ्रिजमध्ये ठेवता का? त्याआधी हे वाचा

अंड्यामध्ये उच्च प्रकारचे प्रथिने आढळतात. आणि यामुळे शरीराच्या स्नायूसह ,अंतकाची देखभाल आणि दुरूस्ती करण्यास मदत होते.

- Advertisement -

जीवनसत्व ड अंड्यात जास्त प्रमाणात आढळले जाते. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

सुदृढ शरीरसाठी दररोज अंड्याचे सेवन करावे,तसेच पोषक आहारासाठी अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात ताणतणाव, मोतीबिंदू, प्रोस्‍टेट ग्रंथीची वाढ, कर्करोग इत्‍यादी आजारांवर अंड्यातील सुक्ष्‍म पोषकमूल्‍य सेलिनियम याचा उपयोगी प्रभावी ठरत असल्याचे तज्ञाचे मत आहे

अनेकदा अंड्याचे सेवन निरोगी केसांची वाढ, नखांचे आरोग्‍य, नितळ चमकदार त्‍वचा व शरीर वाढीस सुद्धा उपयोगी ठरल्याचे दिसते.  अंडी आवश्‍यक असल्‍यामुळे सर्वांच्‍या आहारात अंडी  असणे गरजेचे आहे.

सरकारतर्फे अंगणवाडी, बालवाडी ,शाळांमधून,समाज माध्यमातून अंड्यांचे महत्‍व मुलांना पटवून देण्यात येते निरोगी सदृढ भारत निर्माण करण्यासाठी अंडीफार म्हवपूर्ण आहार आहे यात शंका नाही.


हे हि वाचा – इम्युनिटी बूस्टर ‘चिकन सूप’ नक्की ट्राय करा

- Advertisement -