शरीरासाठी झोप अत्यंत महत्त्वाची असते. तज्ञांच्या मते, सुदृढ आरोग्यासाठी किमान 7 तासांची झोप आवश्यक असल्याचे सांगितले जाते. अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. रात्रीच्या झोप न लागणे ही आजकाल सामान्य समस्या झाली आहे. यावर उपाय म्हणून गोळ्या-औषधे घेतली जातात. पण, तज्ञांच्या मते, रात्री शांत आणि गाढ झोप लागण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपाय करू शकता. ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होण्याची चिंता सतावणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात, निद्रानाश दूर होण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय
तेलाने मालिश करणे –
निद्रानाशेची तक्रार कमी करण्यासाठी तुम्ही अभंग्य म्हणजेच तेलाने मालिश करायला हवी. तेलाने मालिश केल्यावर शांत झोप लागते आणि शरीराला आराम मिळतो. तीळ किंवा खोबरेल तेलाने मालिश करणे सोयीस्कर जाईल.
प्राणायाम –
प्राणायम करणे शरीरासाठी फायद्याचा असतो. प्राणायामच्या सरावाने शरीराला अनेक फायदे होतात. शांत आणि गाढ झोपेसाठी तुम्ही भ्रामरी किंवा शितली प्राणायामचा सराव करायला हवा.
दूध प्यावे –
झोपायच्या आधी दूध प्यावे. दूधात ट्रिप्टोफॅन असते, ज्यामुळे मेंदू शांत होण्यास मदत मिळते आणि तुम्हाला शांत, गाढ झोप लागू शकते. त्यामुळे निद्रनाशेची समस्या असेल तर झोपण्याआधी दूध पिण्याची सवय लावायला हवी.
हळदीचे दूध –
रोज रात्री हलके गरम हळदीचे दूध पिणे फायद्याचे ठरेल. निद्रानाशेची समस्या दूर करण्यासाठी हळदीचे दूध पिणे रामबाण उपाय मानला जातो. हळदीचे दूध प्यायल्याने केवळ शांत झोपच नाही तर शरीराच्या अनेक तक्रारी कमी होण्यास मदत मिळते.
अश्वगंधा –
अश्वगंधा आयुर्वेदिक वनस्पती आहे. निद्रानाशेची समस्या दूर करण्यासाठी अश्वगंधा तुम्ही दुधात टाकून प्यायला हवे. याच्या सेवनाने शांत झोप तर लागते शिवाय मानसिक आरोग्य उत्तम राहते.
हेही पाहा –