Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीFashionNavratri 2024 Colours : नवरात्रीचे नऊ दिवस या 9 रंगाचे कपडे करा...

Navratri 2024 Colours : नवरात्रीचे नऊ दिवस या 9 रंगाचे कपडे करा परिधान

Subscribe

3 ऑक्टोबरपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. शारदीय नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये भाविक विविध नियमांचे पालनही करतात. त्यातील एक नियम असा आहे की पूजेच्या वेळी भक्ताने देवीचा आवडता रंग (Navratri Nine colours 2024) लक्षात घेऊन कपडे घालावेत. याशिवाय पूजेच्या वेळी परिधान केलेले कपडे घाण किंवा फाटलेले नसावेत, याचीही काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आम्ही तुम्हाला यंदाच्या नवरात्री उत्सवासात कोणत्या दिवशी कोणते रंग परिधान करावे आणि या रंगाचे काय महत्व आहे जाणून घेऊया.

नवरात्रीच्या नऊ रंग

3 ऑक्टोबर 2024, गुरुवार, पहिला दिवस : पिवळा रंग
4 ऑक्टोबर 2024, शुक्रवार, दुसरा दिवस : हिरवा रंग
5 ऑक्टोबर 2024, शनिवार, तिसरा दिवस : राखाडी रंग
6 ऑक्टोबर 2024, रविवार, चौथा दिवस: नारंगी रंग
7 ऑक्टोबर 2024, सोमवार, पाचवा दिवस शुभ्र पांढरा रंग
8 ऑक्टोबर 2024, मंगळवार, सहावा दिवस: लाल रंग
9 ऑक्टोबर 2024, बुधवार, सातवा दिवस : निळा रंग
10 ऑक्टोबर 2024, गुरुवार, आठवा दिवस : गुलाबी रंग
11 ऑक्टोबर 2024, शुक्रवार, नववा दिवस : जांभळा रंग

नवरात्रीच्या नऊ रंगाचे महत्व

पिवळा : यंदाच्या नवरात्रीमध्ये पिवळ्या रंगाची साडी देवीला नेसवली जाते. पिवळा रंग म्हणजे संपत्ती आणि स्नेहाचं प्रतिक.

हिरवा: हिरवा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतिक आहे. हा रंग स्कंदमाता देवीचा आवडता रंग आहे.

राखाडी : नवरात्री उत्सवात दरवर्षी करडा हा असतोच. कात्यायनी देवीचा आवडता म्हणजे करडा रंग.

नारंगी : नारंगी रंग म्हणजे भक्ती आणि शांततेचा प्रतीक मानला जातो.

पांढरा : पांढरा रंग निर्मळ, शांतता, पवित्रतेचे प्रतीक आहे.

लाल : लाला रंग शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. हा रंग ‘ब्रम्हचारिणी’ देवीचा आवडता रंग आहे.

निळा : निळा रंग म्हणजे सुंदरता, दृढ विश्वासाचा. निळा रंग हा महागौरी देवीचा आवडता रंग आहे.

गुलाबी : गुलाबी रंग म्हणजे प्रेम आणि सद्भाव. हा रंग प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो.

जांभळा : जांभळा रंग हा चंद्रघंटा देवीचा आवडता रंग आहे. महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो.


Edited By : Nikita Shinde

Manini