मानेचे दुखणे ही आता कॉमन समस्या झाली असून तासन् तास लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईलमध्ये डोक खुपसवून बसणाऱ्या व्यक्तींमध्ये ही समस्या आढळते. कारण खूप वेळ खाली मान खालून लॅपटॉप,कॉम्प्युटर आणि मोबाईल वर काम केल्याने मानेच्या नसांवर त्यांचा ताण पडतो त्यामुळे मान दुखू लागते. अशावेळी डॉक्टर व्यायाम करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे घट्ट झालेल्या नसा मोकळ्या होतात. शिवाय मानेचे व्यायाम नियमित केल्याने लवकर बरे वाटते. पण जर तुम्ही लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईलवर तासन् तास न घालवताही तुमची मान कायम दुखत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण तुमच्या या दुखण्याची विविध कारणंही असू शकतात.
यातील अजून एक कारण असू शकते तुम्ही झोपताना डोक्याखाली घेत असलेली उशी. याचा अर्थ मानेचे दुखणे हे फक्त दिवसभर मान मोडून लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईलवर बिझी असणेच असेल असे नाही. तर कधी कधी चुकीच्या पोझीशनमध्ये झोपल्यानेही मानेवर ताण येऊ शकतो.
योग्य उशी
तसेच काहीजणांना झोपताना डोक्याखाली उंच उशी घेण्याची सवय असते. त्यामुळेही मानेवर ताण पडतो. सकाळी उठल्यावर मानेचे स्नायू आखडल्याचे जाणवते. यामुळे नेहमी योग्य उशीची निवड करावी. आता तर मार्केटमध्ये मानेचा त्रास असेल तर काही वेगळ्या पद्धतीच्या उशा सहज मिळतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या तुम्ही घेऊ शकता.
साईड उशी
रात्री झोपताना डोक्याखाली उशी घेण्याबरोबरच एक साईज उशीही घ्यावी. त्यामुळे झोपताना बॉडीला पोश्चर मिळते. प्रामुख्याने ज्यांना कंबरदुखीचा त्रास असेल तसेच, गर्भवती महिलांसाठीही ही साईड उशी उपयुक्त ठऱते
ताण,तणाव
मानेच्या दुखण्याचे कारण मानसिक ताण, तणावही असू शकते. जर खूप वेळ एकाच पोझिशनमद्ये तुम्ही मान ठेवली तरीही मान दूखू लागते.
मुका मार
जर तुम्हाला कधीकाळी काही लागले असेल किंवा मुका मार लागला असेल, अपघात झाला असेल तर अशावेळीही मानेच्या मागच्या बाजूला दुखू लागते.