Wednesday, February 21, 2024
घरमानिनीHealthकडूनिंबाच्या पानांमुळे 15-20 दिवसात होईल वजन कमी

कडूनिंबाच्या पानांमुळे 15-20 दिवसात होईल वजन कमी

Subscribe

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण घरात विविध प्रयोग करतात. अनेकदा यामुळे काहीही फरक जाणवत नाही. मात्र, कडूनिंबाच्या पानांच्या वापराने तुम्हाला वजन कमी करण्यास नक्की फायदा होऊ शकतो. आयुर्वेदात विविध आजारांवरील उपचारांसाठी कडूनिंबाच्या पानांचा उपयोग केला जातो. त्वचेचे आजार, चर्मरोग अशा अनेकजण समस्यांवर कडूनिंबाच्या पानांचा काढा गुणकारी मानला जातो. किडणी आणि लिव्हरसंबंधीत आजारांवरही हा काढा फायदेशीर ठरतोय. या काढ्याचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिज्मचे प्रमाण वाढते तसेच कॉलेस्ट्ररॉलचे प्रमाण घटते. यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.

कडूनिंबाच्या पानांचा काढा कसा बनवाल?

Neem Benefits: From Acne-Free Skin To Better Hair Growth, Know All The Beauty Benefits Of These Leaves - News Samachar

- Advertisement -
साहित्य :
 • कडूनिंबाची पानं
 • आलं
 • मध
 • लिंबाचा रस
 • काळी मिरी
 • पाणी
कृती :
 • सर्वप्रथम कडूनिंबाच्या पानांना स्वच्छ धुवून घ्या आणि साफ करा.
 • आता एका पातेल्यात 2-3 ग्लास पाणी घेत त्यात कडूनिंबाची पानं टाका.उकळत्या पाण्यात ही पानं व्यवस्थित उकळून घ्या.
 • यानंतर त्यात आलं आणि कुटलेली काळी मिरी टाका.
 • यानंतर पाण्याचे प्रमाण घटले की गॅस बंद करा आणि मिश्रण गाळून घ्या.
 • आता यात लिंबाचा रस आणि मधं मिसळा आणि याचे सेवन करा.

 कडूनिंबाच्या काढ्याचे सेवन कधी करावे?

Neem Ke Fayde | नीम के फायदे व नुकसान | Neem ke Patte Ke Fayde

सकाळी उपाशी पोटी तुम्ही कडूनिंबाच्या काढ्याचे सेवन करु शकतात. यानंतर एक ते अर्धा तास काहीचं खाऊ नये. अशाप्रकारे जर तुम्ही रोज केल्यास तुम्हाला वजनात 15-20 दिवसांत फरक जाणवेल.

- Advertisement -

हेही वाचा :

सोया चंक्स खाणं खरंच फायदेशीर?

- Advertisment -

Manini