कडुलिंब हे आपल्या आरोग्यासह केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीमायक्रोबियल, अँटीफंगल आणि बुरशीनाशक गुणधर्म असल्यामुळे केसांच्या सर्व समस्या दूर होतात. केसांच्या अनेक समस्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जातो. आज आपण या लेखातून जाणून घेऊयात कडुलिंबामुळे केसांच्या कोणत्या समस्या दूर होतील.
केस पांढरे होणे
केस आता कोणत्याही वयात पांढरे होतात. ही समस्या आता खूप सामान्य समस्या झाली आहे. बऱ्याचदा आपण अनेक उपाय करतो हे सर्व उपाय करून देखील आपले केस काळे होत नाही. अशावेळी तुम्ही कडुलिंबाचा वापर करू शकता. कडुलिंबामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे टाळूला पोषण देण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह ताण टाळण्यास मदत करतात. ज्यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत. पाण्यामध्ये आवळा पावडर आणि कडुलिंबाची पावडर मिसळा आणि नंतर ते तुमच्या टाळूवर लावा सुमारे अर्ध्या तासाने केस धुवा. या उपायांनी पांढरे केस लवकर काळे होतील.
केस गळणे
जर तुमची केस खूप गळत असतील किंवा खूप पातळ झाली असतील तुम्ही कडुलिंबाचा वापर करू शकता. हे केसांना मजबूत आणि ब्लड सर्कुलेशन चांगलं करायला मदत करते. केस गळती कमी करण्यासाठी,नारळाच्या तेलात काही थेंब कडुलिंबाचे तेल मिसळा. आता ते थोडे गरम करा आणि नंतर नियमितपणे तुमच्या टाळूची मालिश करा.
कोंडयाची समस्या
जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर या समस्येसाठी कडुलिंब खूप फायदेशीर आहे. कडुलिंबामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. जे कोंडा दूर करण्यास मदत करतात.यामुळे केवळ डोक्यातील कोंडा बरा होत नाही तर टाळूतील खाज कमी होण्यासही मदत होते. प्रथम कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा आणि नंतर ती थंड करा. आता या पाण्याने केस धुवा. याशिवाय, कडुलिंबाच्या पानांची पावडर दह्यामध्ये मिसळून केसांचा मास्क म्हणून देखील लावता येते.
हेही वाचा : Eye Health : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी खावेत हे सुपरफूड्स
Edited By : Prachi Manjrekar