Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Health मानसिक आरोग्यासाठी निगेटिव्ह भावना फायदेशीर

मानसिक आरोग्यासाठी निगेटिव्ह भावना फायदेशीर

Subscribe

प्रत्येक व्यक्तीच्या मनात निगेटिव्ह भावना येता. मात्र लोक त्याला वाईट मानत त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. ऐवढेच नव्हे तर काही लोक यामुळे दु:खी सुद्धा होतात. परंतु काही वेळेस निगेटिव्ह भावना या तुमच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. यासाठी तुम्ही त्याकडे आव्हानात्मक रुपाने घेऊ शकता. यामुळे तुमचे मन प्रसन्न राहते. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार ही बाब समोर आली आहे.

खरंतर आपण आपल्या भावी आयुष्य आणि कामामुळे चिंतेत असतात. यामुळे आपण दुसऱ्यांशी सुद्धा व्यवस्थितीत वागत नाहीत. पण अशा स्थितीत आपण का येतो आणि त्यावर कसे वागतो याचा कुठे ना कुठेतरी परिणाम तुमच्या आयुष्यावर ही होतो.

- Advertisement -

एका संशोधनात असे समोर आले आहे की, आपण जसे वयाने वाढतो तसे आपल्याला निगेटिव्ह इमोशनचा सामना करावा लागतो. त्यापासून पळ काढण्याऐवजी सामना करा. तसे नाही केले तर तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करु शकतो. काही लोक असे मानतात की, मानसिक स्थिती बिघडण्यामागे इमोशनचाच मोठा वाटा असतो. काहीवेळेस अधिक इमोशनल व्यक्तींना सुद्धा वाईट मानसिक ताणाचा सामना करतात.

निगेटिव्ह भावना असलेली लोक उदास, भीत्री आणि रागाने घेरलेले असतात. अन्य लोकांच्या तुलनेत त्यांना अधिक भितीचा सामना करतात. त्यामुळेच त्यांनी आनंदी आयुष्य जगण्याचा विचार जरी केला तरीही त्यांच्या समोर नकारात्मकता दिसते. पण यामधून शिकून पुढे गेल्यास तरच तुमची प्रगती होऊ शकते. प्रत्येक वेळी नकारात्मक भावना घेऊन आयुष्य जगणे म्हणजे एखाद्या दडपणाखाली जगण्यासारखे आहे. जर तुम्ही काही गोष्टी करण्यास सक्षम असाल तर त्या करा.


- Advertisement -

हेही वाचा- आनंदी राहण्यासाठी स्वत:सह पार्टनरला ठेवा खुश

- Advertisment -

Manini