Thursday, April 18, 2024
घरमानिनीBreak up नंतर करू नये 'हे' काम

Break up नंतर करू नये ‘हे’ काम

Subscribe

रिलेशनशिपमध्ये जेव्हा ब्रेकअप होते तेव्हाची स्थिती फार वाईट असते. याचा मानसिक आरोग्यावर ही फार मोठा परिणाम होतो. कारण एखाद्या व्यक्तीला आपण आपलेसे केल्यानंतर तोच व्यक्ती आता आयुष्यातून निघून जाणार याचे दु:ख हे कसे असते ते व्यक्त न करता येण्यासारखे आहे. पण हेच दु:ख घेऊन जगल्याने तुम्ही नव्याने काही गोष्टी करुच शकत नाही. जरी कुठे जायचे म्हटले तरी तुम्ही एक्सचा प्रथम विचार करता. सतत त्याची येणारी आठवण ही तुमच्या मनाला दुखावते पण ब्रेकअप झाल्यानंतर अशा काही गोष्टी करणे खरंच टाळल्या पाहिजेत ज्यामुळे लोक तुम्हाला सातत्याने एक्स पार्टनरचा विचार करायला भाग पाडतात.

-रिलेशनशिप स्टेटस बदलू नका

- Advertisement -


ब्रेकअप नंतर लगेच आपल्या व्हॉट्सअॅप-फेसबुकसह इंस्टाग्रामवर दु:ख भरे स्टेटस लावण्याची काहीच गरज नाही. कारण असे केल्याने त्याचा प्रभाव तुमच्या मानसिक आरोग्यावर ही पडू शकतो.

-एक्स पार्टनरला ब्लॉक करु नका

- Advertisement -


ब्रेकअप नंतर सोशल मीडियात एक्स पार्टनरला अनफ्रेंन्ड अथवा ब्लॉक करु नका. तुमच्या अशा या वागण्यामुळे दुसऱ्यांना तुमच्याबद्दल चर्चा करण्यासाठी विषय मिळेल.

-नव्या पार्टनरसोबतचे फोटो


आपल्या एक्स पार्टनरला वाईट वाटावे म्हणून नव्या पार्टनरसोबतचे फोटो शेअर करु नका. असे केल्याने लोक तुम्हाला जज करतात. ऐवढेच नाही तर त्यांना असे ही वाटू शकते की, नात्यात तुम्हीच पार्टनरला फसवले आहे.

-नजर ठेवणे


ब्रेकअप नंतर आपल्या एक्स पार्टनवर पाळत ठेवल्याने काही होणार नाही. असे करुन तुम्ही स्वत: लाच दु:खी करुन घेता.

-ऑनलाईन पार्टनर शोधणे


ब्रेकअप नंतर भावनिक त्रास कमी करण्यासाठी काही ना काहीतरी केले पाहिजे. पण ऑनलाईन पार्टनर शोधणे हा बेस्ट ऑप्शन नाही.

-वाद घालण्यापासून दूर रहा


ब्रेकअपनंतर ही जर तुम्ही एक्स पार्टनरशी वाद घालत असाल तर ही तुमचीच मोठी चूक आहे. कारण पार्टनरच्या मनात आता तुमच्याबद्दल प्रेम नसते.

 


हेही वाचा- रिलेशनशिपमध्ये पार्टनरला Cheat केलंय तर, माफीही मागा

- Advertisment -

Manini