Friday, April 26, 2024
घरमानिनीHealthसकाळच्या नाश्त्यामध्ये चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ

सकाळच्या नाश्त्यामध्ये चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

Subscribe

सकाळच्या नाश्ता आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. यामुळे आपल्याला दिवसभर काम करायची ऊर्जा मिळते. त्यामुळे नाश्त्यामध्ये नेहमी पौष्टिक आहाराचा समावेश करायला हवा. मात्र, काहीजण सकाळचा नाश्ता तर करतात परंतु यामध्ये असे काही पदार्थ खातात जे त्यांच्या शरीरासाठी नुकसानदायक असते.

सकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊ नका ‘हे’ पदार्थ

  • तळलेले पदार्थ


सकाळच्या नाश्त्यामध्ये तळलेले पदार्थ कधीही खाऊ नये. तेलकट पदार्थांमुळे तुम्हाला दिवसभर अॅसीडीटीचा त्रास होऊ शकतो.

- Advertisement -
  • व्हाईट ब्रेड


अनेकजण सकाळच्या नाश्त्यामध्ये चहा किंवा कॉफीसोबत व्हाईट ब्रेड खातात. मात्र, व्हाईट ब्रेडमध्ये कमी पोषक तत्व असतात.

  • पॅकेटबंद ज्यूस


फळांचा रस आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम असतो. मात्र, बाजारात मिळणारे पॅकेटबंद ज्यूस तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.

- Advertisement -
  • मसालेदार पदार्थ


सकाळच्या नाश्त्यामध्ये मसालेदार पदार्थ खाणं टाळायला हवं. कारण मसालेदार पदार्थांमुळे तुम्हाला दिवसभर अॅसीडीटीचा त्रास होऊ शकतो.

  • कॉफी


अनेकजण सकाळी उपाशीपोटी कॉफी पिणं पसंत करतात. चुकूनही उपाशीपोटी कॉफी पिऊ नये. हे शरीरासाठी खूप घातक सिद्ध होऊल.

  • स्मूदी


स्मूदी पिणं शरीरासाठी उत्तम असतं. मात्र, सकाळच्या नाश्त्यामध्ये याचे सेवन केल्यास रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये स्मूदी पिऊ नये.

 


हेही वाचा :

पोळी की भात? हेल्दी राहण्यासाठी काय खाणं जास्त फायदेशीर

- Advertisment -

Manini