असे नव्हे की, प्रत्येक व्यक्ती परपेक्ट असतो. चुका सर्वांकडून होतात. मात्र अशा काही चुका असतात ज्या कधीच विसरता येत नाही. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर पार्टनरला त्याच्यामधील चुका, कमतरता यासोबत स्विकारावे. अशातच तुम्ही रिलेशनशिपमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्या. आपला पार्टनर हा नेहमीच आपल्याला समजून घेणारा असावा असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळे पुढील काही प्रकारच्या पुरुषांसोबत रिलेशनशिपमध्ये जाण्यापूर्वी विचार करा
– सन्मान करणारा नसेल
नात्यात प्रेम, एकमेकांबद्दल भावना असणे फार महत्त्वाचे असते. मात्र जर पार्टनर तुमचा सन्मान करणारा नसेल तर नात्यात वाद होऊ शकतात. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये पार्टनर निवडताना तो तुम्हालाच नव्हे तर एकूणच महिलांना सन्मान देतो का हे पहा.
-मदत करणारा नसेल
जो पुरुष कोणालाच मदत करणारा नसेल अशा व्यक्तीशी कधीच नाते जोडू नका. कारण एखाद्या आपत्कालीन स्थितीत जर तुम्हाला त्याची गरज भासल्यास तो व्यक्ती तुमच्या कामी येणार नाही.
-नात्यात लॉयल नसेल
जो पुरुष एकदा फसवू शकतो तो पुन्हा तसेच करू शकतो. कोणत्याही नात्यात लॉयल असणे अत्यंत गरजेचे असते. विश्वास हा नात्यातील महत्त्वाचा धागा मानला जातो. पार्टनर जर तुम्हाला ऑफिसमध्ये आहे असे सांगून दुसरीकडेच असेल तर तो तुम्हाला फसवतोय.