Wednesday, March 19, 2025
HomeमानिनीVastu Tips : ही भांडी कधीही ठेवू नका उलटी नाहीतर

Vastu Tips : ही भांडी कधीही ठेवू नका उलटी नाहीतर

Subscribe

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे अनेक नियम आहेत. ज्यांचे पालन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सुख-समृद्धी येते. वास्तुशास्त्रात योग्य दिशा आणि योग्य स्थानाला विशेष महत्त्व दिले जाते. वास्तुमध्ये स्वयंपाकघराबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज आपण जाणून घेऊयात स्वयंपाकघरातील कोणती भांडी कधीही उलटी ठेवू नये .

ही भांडी कधीही उलटी ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार चपाती बनवताना वापरले जाणारे तवे कधी उलटे ठेवू नये. तवा उलटा ठेवल्याने कुटुंबात आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. जर तुमच्या घरात कोणी असे करत असेल तर त्याला असे करण्यापासून रोखा.वास्तुशास्त्रात असे देखील म्हटले जाते की तव्यासोबत कढई देखील उलटी ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे ही भांडी चुकूनही उलटी ठेवू नये.

 तवा उजव्या बाजूला ठेवा

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना तवा आणि कढई उजव्या बाजूला ठेवावी. यामुळे घरात समृद्धी येते. तवा उजव्या बाजूला ठेवल्याने स्वयंपाकघर व्यवस्थित दिसते आणि स्वयंपाकघर स्वच्छ करणे सोपे होते.

पाणी आणि दूधाची भांडी

पाणी आणि दूध साठवण्याची भांडी हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे पाण्याच्या किंवा दुधाच्या भांड्यांना उलटे ठेवू नये.

तांब्या

पीतळेची भांडी ही भांडी सकारात्मक ऊर्जा वाढवतात, म्हणून ती व्यवस्थित ठेवावी.

तुपाचे किंवा तेलाचे डबे

तुपाचे किंवा तेलाचे डबे कधीही उलटे ठेवू नये. यांना उलटे ठेवल्यास अन्नधान्य व संपत्तीवर परिणाम होतो असे मानले जाते.

धूप किंवा पूजेची थाळी

पूजेच्या वस्तूंना आदराने ठेवणे महत्त्वाचे आहे, म्हणून त्यांना उलटे ठेवू नये. हेही वाचा : Cleaning Tips : मुलांनी रंगवलेल्या भिंती अशा करा क्लिन


Edited By : Prachi Manjrekar

Manini