Friday, September 29, 2023
घर मानिनी Health रात्रीचे जेवण बंद करणे आरोग्यास हानिकारक

रात्रीचे जेवण बंद करणे आरोग्यास हानिकारक

Subscribe

आजकाल वजन कमी करण्यासाठी विविध डाएट फॉलो केले जातात. त्यामुळे वजन ही कमी होते. मात्र याचे काही परिणाम ही आरोग्यावर होतात. वजन कमी करण्याच्या प्रवासात आपण रात्रीचे जेवण जेवत नाही. हा ट्रेंन्ड आजकाल खुप फॉलो केला जातो. लोकांना असे वाटते की, जर त्यांनी रात्रीचे जेवण बंद केले तर त्यांचे वजन कमी होईल. खरंतर जेवण एक दिवस स्किप केल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होत नाही. मात्र दररोज असे केल्याने आरोग्यासंबंधित काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (health issue due to night dinner skip)

रात्रीचे जेवण बंद केल्याने शरिरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते आणि काही कामं करण्यासाठी शरिरात उर्जा सुद्धा राहत नाही. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि रात्रीचे जेवण खातच नसाल तर अशी चुक अजिबात करु नका. यामुळे आरोग्याला नुकसान पोहचू शकते.

- Advertisement -

शरिरात उर्जेची कमतरता
एक्सपर्ट्सच्या मते आपल्या शरिराला अॅक्टिव्ह आणि हेल्दी ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात खाणे अत्यंत गरजेचे असते. जर पाचनक्रियेत अडथळा निर्माण झाल्यास तर ते आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. काही लोकांना असे वाटते की, शरिरातील उर्जा खर्च होत नाही आणि याच कारणास्तव जेवलो नाही तर आरोग्यावर सुद्धा काही परिणाम होणार नाही. असा विचार करणे चुकीचे आहे. कारण रात्री झोपताना शरिरातील खुप उर्जा खर्च होते. यामुळेच रात्री झोपण्यापूर्वी पुरेशा प्रमाणात जेवणे फार गरजेचे असते.

झोपेवर परिणाम
जी लोक रात्रीचे जेवण बंद करतात त्यांना झोपतेवेळी समस्या उद्भवू शकते. एक्सपर्ट्स असे म्हणतात की, भूक लागल्याने झोप डिस्टर्ब होते. ऐवढेच नव्हे तर कधी-कधी रिकाम्या पोटी गॅस तयार होऊ लागते आणि याच कारणास्तव झोप ही व्यवस्थितीत लागत नाही. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रात्रीचे जेवण हलक्या स्वरुपाचे घ्या.

- Advertisement -

पोषक तत्त्वांची कमतरता
शरिराला हेल्दी आणि अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी पोषक तत्त्वांची अत्यंत गरज असते. जी लोक रात्री जेवत नाहीत त्यांच्यामध्ये एका काळानंतर पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते. शरिरात पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे काही आजार ही मागे लागतात. या व्यतिरिक्त कुपोषणाची समस्या ही उद्भवू शकते. चक्कर येणेष शरिरात रक्त कमी तयार होणे असा समस्या ही होतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी थोडेफार काहीतरी खाऊन जरुर झोपावे असा सल्ला दिला जातो.


 हेही वाचा- तुम्ही सकाळी उठल्यानंतर कॉफी पिता? तर आधी हे वाचा

- Advertisment -

Manini