Thursday, March 27, 2025
HomeमानिनीHealthNita Ambani : नीता अंबानींनी शेअर केले फिटनेस सिक्रेट

Nita Ambani : नीता अंबानींनी शेअर केले फिटनेस सिक्रेट

Subscribe

आंतरराष्ट्रीय महिला दिन नुकताच साजरा झाला. या महिला दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता मुकेश अंबानी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. वयाच्या 61 व्या वर्षीदेखील नीता अंबानी एकदम फिट आहेत. त्यांनी त्यांच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये आपल्या फिटनेसचे सिक्रेट सर्वांना सांगितले आहे. महिलांनी व्यायामाच्या मदतीने आपले आरोग्य जपले पाहिजे असा संदेशच त्यांनी त्यांच्या या व्हिडीओमधून दिला आहे.

या व्हिडीओमध्ये नीता अंबानी म्हणतात, “आपण स्त्रिया स्वत:चा विचार नेहमी सगळ्यात शेवटी करतो.आणि हळूहळू आपल्या नकळत आपल्या शरीराचे म्हणणे ऐकणे थांबवतो. आपण स्वत:ची काळजी घेणार नाही तर कोण घेणार ? जर तुमचे वय 50 किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याची आणि स्वत: ची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. वयाच्या 30 व्या वर्षानंतर दर दशकात महिलांच्या स्नायूंची 3 ते 8% घट होते. वयानुसार ही प्रक्रिया वेगवान होत जाते. काळाबरोबर आपल्या शरीरातही अनेक बदल होतात.आपण स्नायू, हाडांची घनता, संतुलन, गतिशीलता, ताकद गमावतो. आपली पचनशक्ती आणि सहनशीलता देखील कमी होत जाते.”

Nita Ambani: Nita Ambani shared her fitness secret
Image Source : Social Media

आपल्या नृत्याच्या आवडीबद्दल आणि व्यायामाबद्दल त्या म्हणाल्या, “पायांचा व्यायाम मला विशेषत: आवडतो. माझे पाय म्हणजे एका नर्तकीचे पाय आहेत. कारण मी वयाच्या सहाव्या वर्षापासून भरतनाट्यम करते आहे. कधी पाय, कधी शरीराचा वरचा भाग, कधी पाठ – असे मी व्यायामाच्या दृष्टीने दररोज शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर लक्ष केंद्रित करते.आठवड्यातून 5 ते 6 दिवस नियमित व्यायाम करते. हालचाल, शरीराची लवचीकता, योग आणि कोअर स्ट्रेंथ सुधारणे या गोष्टींवर मी दररोज लक्ष केंद्रित करते. कधीकधी मी पोहणे आणि पाण्यातला व्यायाम यावरही भर देते. कधीकधी मी तासभर नृत्यसाधनेत घालवते, जे मला खूप प्रिय आहे. प्रवासात असताना, व्यायामाची साधने सोबत नसतील तर मी 5000 ते 7000 पावले चालते. मी जेव्हा व्यायाम करते तेव्हा मला शांततेचा अनुभव होतो. व्यायामामुळे मी दररोज सकारात्मक विचार करते. नियमित व्यायामामुळे आपले शरीर एंडोर्फिनचा म्हणजे आनंदाचा अनुभव देणाऱ्या संप्रेरकाचा रक्तात स्राव होतो. ज्यामुळे आपला ताण कमी होतो.”

Nita Ambani: Nita Ambani shared her fitness secret
Image Source : Social Media

व्यायामासोबतच आहाराबाबतही त्यांनी या व्हिडीओत मार्गदर्शन केले आहे, “मी शाकाहारी आहे आणि सेंद्रिय व निसर्गावर आधारित असलेले अन्न खाते. आपला आहार संतुलित असणे आणि आहारात प्रोटीन घेणे आवश्यक आहे. मी साखर किंवा गोड पदार्थ टाळते.”

“आपल्याला वयाशी लढायचं नाही आहे तर वयानुसार जगायला शिकणे खूप महत्त्वाचे आहेत. जर मी 61 व्या वर्षी हे करू शकते तर तुम्ही का नाही ?स्वत:साठी वेळ काढा आणि स्वत:ला प्राधान्य द्या. आठवड्यातून 4 दिवस, दिवसातून फक्त 30 मिनिटे व्यायाम करा.” असा संदेश देत नीता अंबानींनी व्हिडीओच्या शेवटी ‘स्ट्राँग हर मूव्हमेंट’ मध्ये महिलांना सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.

हेही वाचा : Eye Care : ब्लॅक सर्कल्सपासून सुटका देतील होममेड आय मास्क


Edited By – Tanvi Gundaye

 

Manini