Saturday, September 30, 2023
घर मानिनी Kitchen नॉन-स्टिक पॅनमध्ये जेवण का शिजवू नये?

नॉन-स्टिक पॅनमध्ये जेवण का शिजवू नये?

Subscribe

नॉन-स्टिकची भांडी आपल्या घरी असताच. त्यामध्ये आपण जेवण शिजवणे ते तेलाचा खर्च कमी करण्यासाठी वापर करतो. अशातच वजन कमी होणाऱ्या लोकांच्या कामी येतात. परंतु तुम्हाला माहितेय का, या भांड्यांचा वापर करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.

फ्लेक्स कोटिंगमुळे समस्या
नॉन-स्टिक भांड्यांवर फ्लेक्स कोटिंग असते. जे काळानुसार कमी होऊ शकते. याच कारणास्तव अन्न त्याला चिकटू शकते. त्यामधून दुर्गंधी येऊ लागते. फ्लेक्स कोटिंगच्याच पॅन मध्ये जेवण शिजवल्यास आरोग्याला नुकसान पोहचू शकते.

- Advertisement -

काही आजारांचा धोका
नॉन-स्टिक भांड्यांची खासियत अशी असते की, ते अॅल्युमिनिअम व्यतिरिक्त दुसऱ्या मिश्रणाने तयार केले जाते. त्यामध्ये फ्लोरोकार्बन सब्सटांसचा समावेश असतो. याचा वापर केल्यास वायरस एक्सपोजर वाढू शकते. त्यामुळे कॅन्सर, हार्मोनल डिजीज आणि अन्य हेल्थ समस्या होऊ शकतात. खासकरुन जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या भांड्यात उच्च तापमानाला जेवण शिजवता.

- Advertisement -

स्वाद बिघडू शकतो
जेव्हा नॉन स्टिकची भांडी जुनी होतात तेव्हा त्याचे कोटिंग बिघडले जाते. त्यात जेवण शिजवताना त्याच्या बेसला चिकटू शकते. याच कारणास्तव त्याची चव बिघडली जाऊ शकते. अशातच बेस्ट ऑप्शन असेल की, हाय क्विलिटीची भांडी खरेदी करा. स्वस्त नॉन स्टिक भांडी लवकर खराब होतात.


हेही वाचा- प्रेशर कुकरमध्ये चुकूनही ‘हे’ पदार्थ शिजवू नका अन्यथा होईल नुकसान

- Advertisment -

Manini