सध्या मुलांच्या आवडी-निवडी वरून पालकांना त्यांना कोणते पदार्थ खायला द्यावे, असा प्रश्न सतत पडतो. अनेकदा मुलं नूडल्स हवे असा हट्ट करतात. नूडल्स आरोग्यासाठी चांगली नसतात. त्यामुळे पालक मुलांना नूडल्स देणं टाळतात. परंतु आता मुलांना नूडल्ससाठी नाही म्हणू नका. कारण आता घरच्या घरी ज्वारीचे पौष्टिक नूडल्स तयार करून तुम्ही मुलांचा हा हट्ट नक्कीच पूर्ण करु शकता.
साहित्य :
- 1 वाटी ज्वारीचे पीठ
- 1 चिमूट हिंग
- 1 चमचा तिखट
- 2 चमचे आलं-लसूण पेस्ट
- 3 चमचे तेल
- 1 चमचा जिरे-मोहरी
- 1/2 चमचा हळद
- कढीपत्ता
- 1 बारीक चिरलेला कांदा
- 1 बारीक चिरलेला टोमॅटो
- चवीनुसार मीठ
कृती :
- सर्वप्रथम ज्वारीच्या पिठात 1 चमचा तिखट, चिमूटभर हिंग, मीठ आणि 1 चमचा तेल टाकून चकली च्या पिठाप्रमाणे मळुन घ्यावे आणि चकलीच्या सोऱ्यात मोठ्या शेवची डिश टाकून ज्वारीचे पीठ त्यात भरावे.
- कढई मध्ये पाणी उकळायला ठेवावे आणि त्यात खाली स्टॅण्ड ठेवावे आणि एका डिश ला तेल लावून घ्यावे.
- डिशमध्ये सोऱ्याने शेव पसरून घालावी आणि झाकण ठेवू 10 मिनिटे वाफवून घ्यावी. वाफवून होईपर्यंत नूडल्ससाठी फोडणी करून द्यावी.
- एका कढई मध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात जिरे मोहरी, कडीपत्ता,कांदा, आले लसूण पेस्ट,टाकावी.
- कांदा परतला की त्यात टोमॅटो टाकून परतून घ्यावे. भाज्या परतून झाल्या की त्यात टोमॅटो सॉस आणि मीठ घालावे आणि ज्वारीचे वाफवलेले नूडल्स टाकावे. 5-7 मिनिटे वाफवून घेऊन कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
- Advertisement -
हेही वाचा :
रेस्टॉरंट सारखी घरीच बनवा क्रिस्पी पनीर चिली
- Advertisement -
- Advertisement -