घरताज्या घडामोडीनाकाचा आणि स्वभावाचा असतो थेट संबंध

नाकाचा आणि स्वभावाचा असतो थेट संबंध

Subscribe

माणसाचे व्यक्तिमत्व हे त्याच्या देहबोलीवरून जसे ओळखता येते तसेच ते त्याच्या जडण घडणीवरूनही ओळखता येते. त्यातही तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य़ खुलवणारे नाकही तुमच्याबद्दल बरंच काही सांगून जाते. प्रामुख्याने तुमचा स्वभाव. जाणून घेऊया नाकाचा आकार आणि तुमचा स्वभाव.

मोठे व जाड नाक- मोठे नाक असणाऱ्या व्यक्ती सहनशील असतात. प्रत्येक परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य त्यांच्यात असते. यामुळे कुठलेही संकट असो वा प्रतिकूल परिस्थिती ह्या व्यक्ती त्यातील सुर्वणमध्य साधून प्रश्न सोडवू शकतात.

- Advertisement -

टोकदार नाक-टोकदार किंवा धारदार नाक असलेल्या व्यक्ती शिस्तप्रिय असतात. भावनांवर नियंत्रण ठेवण्यात माहीर असतात. बेशिस्तपणा त्यांना चालत नाही. तेवढ्याच त्या रोमँटीकही असतात. व्यवहारात चोख असतात.

चपटे नाक-–चपटे व बसके नाक असलेल्या व्यक्तींचा जनसंपर्क दांडगा असतो. लोकांमध्ये मिसळणे त्यांना आवडते. असे असले तरी यातूनच मग त्यांच्यात अहंपणा वाढीस लागतो.

- Advertisement -

चोचीसारखे नाक- चोचीसारखे नाक असलेल्या व्यक्ती स्वभावाने रागीट असतात. लवकर प्रेमात पडतात. आपल तेच खरं करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. यामुळे यांचा मित्रपरिवार कमी असतो.

छोटे नाक- छोटे नाक असलेल्या व्यक्ती आतल्या गाठीच्या असतात. सगळं मनातल्या मनात ठेवत असल्याने यांची घुसमट होते. पण दुसऱ्याच्या मदतीसाठी मात्र तत्पर असतात. यांच्या हेकेखोर स्वभावामुळे लोकं यांच्यापासून फटकून असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -