Saturday, September 30, 2023
घर मानिनी लग्नानंतर महिला नथ का घालतात? 'हे' आहे धार्मिक कारण

लग्नानंतर महिला नथ का घालतात? ‘हे’ आहे धार्मिक कारण

Subscribe

लग्नानंतर बहुतांश महिला या नाकात नथ घालण्यास सुरुवात करतात. अशातच बहुतांश लोक नथ ही फॅशनच्या दृष्टीकोनातून ही घालतात. खरंतर नथ घालण्याचे वास्तविक कारण हे फॅशन पुर्तेच मर्यादित नाही. तर महिलांनी नाकात नथ घालण्यामागे ही काही खास धार्मिक मान्यता आहेत.

हिंदू धर्मात खुप वर्षांपासून महिला या नाकात नथ घालत असल्याची परंपरा आहे. आजकाल मॉर्डन लाइफस्टाइलमध्ये ही महिला नाकात नथ घालणे पसंद करतात. पण तु्म्हाला नथ घालण्यामागील महत्व माहितेय का? हेच आपण येथे जाणून घेऊयात.

- Advertisement -

वैवाहिक आयुष्याची ओळख
नाकात नथ घालणे हे वैवाहिक आयुष्याची निशाणी समजली जाते. हेच कारण आहे की, लग्नात नथ शिवाय नवरीचा श्रृगांर पूर्ण होत नाही असे मानले जाते. लग्नानंतर सुद्धा नथ घालणे महिलांच्या श्रृगांरामधील फार महत्वाचा हिससा मानला जातो.

सोळा श्रृगांरमध्ये समावेश
हिंदू रीति-रिवाजांमध्ये महिलांच्या सोळा श्रृंगाराचे वर्णन केले जाते. तर नाकातील नथीला सुद्धा त्यामध्ये महत्व दिले जाते. अशातच काही लोक नथला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

- Advertisement -

यामध्ये सुद्धा कमी दुखते
भारतीय आयुर्वेदानुसार महिलांनी नाक टोचणे हे त्यांच्या पुनरुत्पादक अवयवांशी संबंधित आहे. अशातच नाकात नथ घातल्याने महिलांना डिलिव्हरी वेळी त्रास फार कमी होतो.

Nose Ring
Nose Ring

नथ घालण्यामागील मान्यता
नाकात नथ घालण्यामागे सुद्धा एक पौराणिक कारण आहे. त्यानुसार लग्नापूर्वी नाकात नथ घालणे योग्य मानले जाते. पण आता नाकात नथ घालणे ही एक सर्वसामान्य फॅशन झाली आहे. त्यामुळे बहुतांश महिला नाकात नथ घालतात.

दुखण्यापासून मिळतो आराम
मासिक पाळीदरम्यान महिलांना पोटात खुप दुखते. तर भारतीय आयुर्वेदात नाकाच्या एका भागात छिद्र केल्याने मासिक धर्मात दुखणे कमी होते. त्यामुळे नाकात नथ घातल्याने मासिक पाळीवेळील दुखणे कमी होऊ शकते.

सौंदर्य उजळते
नाकात नथ घातल्याने महिलांचे सौंदर्य अधिक उजळून दिसते. आरोग्याला होणाऱ्या फायद्यासह नाकात नथ घातलेल्या महिला सुंदर आणि आकर्षक दिसतात.

 


हेही वाचा: भारतीय साड्यांचा इतिहास, वेदांबरोबरच महाभारतातही उ्ललेख

- Advertisment -

Manini