Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर भक्ती Numerology : तुमचाही जन्म 2,11,20,29 या तारखेला झालाय? जाणून घ्या तुमची खासियत

Numerology : तुमचाही जन्म 2,11,20,29 या तारखेला झालाय? जाणून घ्या तुमची खासियत

Subscribe

ज्याप्रकारे ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल आणि आयुष्याबद्दल अंदाज लावला जातो. त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे भविष्य, गुणांचा अंदाज लावला जातो. अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्माची तारीख ही त्याचा मूलांक असतो. म्हणजेच जर एखादा व्यक्ती कोणत्याही महिन्यातील 9, 18, 27 या तारखेला जन्मले असतील तर त्यांचा मूलांक (9,1+8=9 , 2+7=9) 9 असतो. अशाप्रकारे 1 ते 9 हे मूलांक असतात. दोन अंकी तारीख असल्यास त्या तारखेची बेरीज केल्यावर जो अंक येतो. तो त्या व्यक्तीचा मूलांक असतो.

आज आम्ही तूम्हाला मूलांक 2 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 2 , 11 , 20, 29 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे.

मूलांक 2 असणाऱ्या व्यक्तींची काय आहे खासियत?

- Advertisement -

Is There A Mental Health Reason For Showing No Emotions? | BetterHelp

मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे या व्यक्तिंचा स्वभाव चंद्राप्रमाणेच शांत, सुंदर आणि संयमी असतो. हे व्यक्ती शरीरासोबतच मनाने देखील सुंदर असतात. त्यामुळेच अनेकजण यांच्याकडे सहज आकर्षित होतात.

- Advertisement -

मूलांक 2 चे व्यक्ति धनवान आणि हुशार असतात. त्यामुळे आयुष्यात हे लवकर यशस्वी देखील होतात. यांचा स्वभाव शांत आणि संवेदनशील असल्यामुळे हे लवकर भावूक होतात. हे लोक कधीही इतरांबद्दल वाईट विचार करु शकत नाहीत.

मूलांक 2 असणाऱ्या व्यक्तीं सफतलेसाठी करा ‘हे’ उपाय

Full Moon Effects: What Research Has Discovered

  • या व्यक्तिंसाठी भगवान शंकरांची आराधना करणं उत्तम मानलं जातं.
  • पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे दर्शन घ्यावे.
  • सफेद वस्त्र, पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा.
  • गरजू व्यक्तीला साखर, तांदूळ, दूध अशा सफेद वस्तू दान कराव्या.

हेही वाचा :

Numerology : तुमच्याही जन्माची तारीख 1,10,19,28 आहे? जाणून घ्या स्वभावातील खासियत

- Advertisment -