Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर भक्ती Numerology : खूपच चतूर असतात 4,13, 22, 31 या तारखेला जन्मलेले लोक

Numerology : खूपच चतूर असतात 4,13, 22, 31 या तारखेला जन्मलेले लोक

Subscribe

ज्याप्रकारे ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल आणि आयुष्याबद्दल अंदाज लावला जातो. त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे भविष्य, गुणांचा अंदाज लावला जातो. अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्माची तारीख ही त्याचा मूलांक असतो. म्हणजेच जर एखादा व्यक्ती कोणत्याही महिन्यातील 9, 18, 27 या तारखेला जन्मले असतील तर त्यांचा मूलांक (9,1+8=9 , 2+7=9) 9 असतो. अशाप्रकारे 1 ते 9 हे मूलांक असतात. दोन अंकी तारीख असल्यास त्या तारखेची बेरीज केल्यावर जो अंक येतो. तो त्या व्यक्तीचा मूलांक असतो.

आज आम्ही तूम्हाला मूलांक 4 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 4 , 13 , 22, 31 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे.

मूलांक 4 असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो?

- Advertisement -

अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 असणारे व्यक्ती स्वभावाने खूप चतुर आणि हट्टी असतात. तसेच हे साहसी आणि कुशल देखील असतात. या व्यक्तींना स्वातंत्र्यपणे जीवन जगायला आवडते. यांचा स्वभाव प्रामाणिक आणि विश्वासार्ह असतो. हे आपल्या मतांवर ठाम असतात. मात्र, यांच्यामध्ये काहीप्रमाणात अहंकार देखील असतो. यांना कोणत्याही क्षेत्रात सफतला मिळते.

मूलांक 4 असणाऱ्या व्यक्तीं सफतलेसाठी करा ‘हे’ उपाय

Why is Monday a special day for the worship of Mahadev? Know the reason |  आराधना: महादेव की पूजा के लिए सोमवार क्यों है विशेष दिन? जानें कारण - दैनिक  भास्कर हिंदी

  • मूलांक 4 असणाऱ्या व्यक्तींनी देवी सरस्वती आणि महादेवाची आराधना करावी.
  • निळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा.
  • गरजू व्यक्तींना गहू, पांघरुन, तीळाचे तेलाचे दान करावे.
  • चांदीच्या दागिन्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.

- Advertisement -

हेही वाचा :

Numerology : तुमचा जन्म देखील 3,12 ,21,30 या तारखेला झालाय? जाणून घ्या तुमची खासियत

- Advertisment -