जायफळ हा मसाल्यातील एक पदार्थ असला तरी त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याचे सेवन केल्याने बऱ्याच आरोग्याविषयीच्या समस्या दूर होण्यास मदत होते. जायफळचा वापर केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर सुंदर त्वचेसाठी केला जातो. जायफळ एक नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे जे तुमच्या चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते.
चमकदार त्वचेसाठी जायफळचे फायदे
- डेट स्किन काढण्यास फायदेशीर
जायफळीचा वापर करुन चेहऱ्यावरील डेट स्किन निघण्यास मदत होते. संवेदनशील त्वचा असणाऱ्यांसाठी देखील हे फायदेशीर आहे. यामुळे चेहरा खुलून दिसतो.
- काळ्या वर्तुळांपासून सुटका
डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी जायफळ चोळून त्यात गुलाब पाणी मिसळून डोळ्यांखाली लावा. यामुळे काळी वर्तुळे कमी होतात.
- पिग्मेंटेशनची समस्या दूर करते
जायफळीच्या मदतीने पिदमेंटेशनची समस्या दूर होते. जायफळ नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्याला उजळ बनवते तसेच हायपरपिग्मेंटेशन कमी करते.
- मुरुम आणि पुरळ दूर होतात
जायफळ मुरुम दूर करण्यासाठी खूप रामबाण आहे. जायफळमध्ये मायरीस्टिसिन कंपाऊंड असते ज्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात.
जायफळीचे आरोग्यासाठी फायदे
- जायफळ हे पचन संस्थेसाठी उपयुक्त आहे. जायफळाचे चूर्ण सकाळ, संध्याकाळ खाण्याने पोटदुखीमध्ये आराम मिळतो.
- डोकेदुखी दूर करण्यासाठी शुद्ध कच्च्या दुधामध्ये जायफळ उगाळून माथ्यावर लेप करण्याने फार आराम मिळतो.
- उचकीवर नियंत्रण आणण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांबरोबर जायफळाचे बारीक तुकडे चावावे. उचकी त्वरित बंद होते.
हेही वाचा :