उन्हाळा सुरू होताच अनेकांना डिहायड्रेशनच्या समस्येसोबतच इतर आरोग्य समस्या देखील उद्भवतात. शक्यतो डायबिटीज असलेल्या व्यक्तींना या दिवसात आपली ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी खास गोष्टींची काळजी घ्यावी. शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यासाठी डायबिटीजचे डाएट पाळणे गरजेचे आहे. यासाठी ताजी फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. हे पदार्थ आपल्याला थंड ठेवतील, आपल्या शरीराचे पोषण, उच्च रक्तातील साखर आणि वजन नियंत्रित करतील.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी उन्हाळ्यातील पोषक आहार
- टोमॅटो
टोमॅटो मधुमेहासाठी एक सुपरफूड मानला जातो. यात पोटॅशियम, फोलेट, आहारातील फायबर, मॅंगनीज, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन ई असे अनेक पोषकतत्व असतात. टोमॅटोचे सेवन केल्यास हृदयरोगासारख्या मधुमेहाच्या समस्यां कमी होण्यास मदत होते.
- वांगी
वांग्यामध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात. ही भाजी आहारातील फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, तांबे, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि नियासिन यासह अनेक पौष्टिक पदार्थांचा चांगला स्रोत आहे.
- काकडी
काकडीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरी कमी असतात, परंतु जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि आरोग्यास सुधारण्यास मदत करते.
- ब्लुबेरी
मधुमेह असलेल्या लोकांसाठी स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरी सारख्या बेरी उत्कृष्ट पर्याय आहेत. ब्लूबेरीमध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात. जसे फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, आणि व्हिटॅमिन के. हे सर्व मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात आपली मदत करू शकते.
- स्क्वॉश
स्क्वॉश बर्याच भाज्यांप्रमाणे जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात. हे रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनची पातळी कमी करण्यास मदत करते.
हेही वाचा :