Tuesday, May 30, 2023
घर मानिनी नाश्त्यासाठी बनवा ओट्सचे अप्पे

नाश्त्यासाठी बनवा ओट्सचे अप्पे

Subscribe

आज आम्ही तुम्हाला भरपूर फायबर असलेल्या ओट्सचे अप्पे कसे बनवायचे याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ खाण्याला चविष्ट तर आहेच शिवाय पौष्टीकही आहे.

आपल्याकडे नाश्त्यामध्ये जसे पोहे, उपमा, थालीपीठ हे पदार्थ सर्रास बनवले जातात तसेच दक्षिण भारतात डोसा, ईडलीबरोबरच अप्पे बनवले जातात. तांदूळ आणि उडदाच्या डाळी भिजवून त्याची भरड काढून त्यापासून अप्पे बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला भरपूर फायबर असलेल्या ओट्सचे अप्पे कसे बनवायचे याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ खाण्याला चविष्ट तर आहेच शिवाय पौष्टीकही आहे.

- Advertisement -

साहीत्य- १ कप ओट्स, १ कप सफेद उडीद डाळ, १ मोठा बारीक चिरलेला कांदा, १ सिमला मिरची, १ गाजर बारीक चिरलेले. १ चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ.

- Advertisement -

कृती- मिक्सरमध्ये भिजवलेली उडदाची डाळ बारीक करून घ्यावी.त्यात ओट्सची पावडर ( मिक्सरमध्ये बारीक केलेली) टाकावी. त्यात लाल मिरची पावडर,काळी मिरी पावडर, मीठ टाकावे. नंतर त्यात चिरलेला कांदा, गाजर, सिमला मिरची टाकून मिश्रण एकत्र करून घ्यावे. अप्पे पॅनमध्ये तेल सोडून अप्पे टाकावे. दोन्ही बाजूने खरपूस लालसर होईपर्यंत भाजावे. हिरव्या चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करावे.

 

 

 

 

- Advertisment -

Manini