उन्हाळ्यात आपण सगळेच घराबाहेर पडायला कंटाळतो. तरी देखील इच्छा नसतानाही बाहेर जावे लागते. तसेच महिलांना रोज ऑफिसला जावं लागतं आणि अशा परिस्थितीत त्वचेसोबतच आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. हल्ली वातावरण बिघडले असून याचा परिणाम त्वचेला खूप होतो. अशा वेळी त्वचेतील कोरडेपणा, चिडचिड, सनबर्न, टॅनिंग आदी समस्यांना सामोरे जावे लागते. अशातच योग्यवेळी जर काळजी घेतली नाही तर याचा अधिक परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो.
महिला या ऑफिसला निघताना खूप मेकअप करतात. तसेच सौंदर्यप्रसाधनांचा अतिरेक वापर यामुळे चेहरा काळ पडू शकतो किंवा चेहऱ्याची त्वचा खराब पडणे,फोड्या येणे हे त्यामागचं एक प्रमुख कारण आहे. अशातच अनेकदा सौंदर्यप्रसाधनांच्या अतिवापर केला जातो आणि त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक घटकांमधील समतोल बिघडतो आणि कायमस्वरूपी फेसची स्किन डल किंवा खराब दिसते.
1. दिवसातून दोनदा क्लिंझर वापर करा-
- दैनंदिन दिवसात दोनदा क्लिंझरने चेहरा धुवावा.
- तसेच चांगल्या प्रतीचा क्लिंझर वापरावा.
- चेहरा धुताना हलक्या हाताने धुवा तसेच खूप घट्ट स्क्रब होणार नाही याची काळजी घ्या.
- नंतर, कोमट पाण्याने स्वच्छ चेहरा धुवून घ्या. कारण कोमट पाण्याने त्वचा लगेच स्वच्छ होते.

- चेहरा क्लीनझिंग करून झाल्यानंतर टोनरचा वापर करावा.
- टोनरमुळे त्वचेला गुळगुळीत, आणि मऊपणा येतो.
- टोनरमध्ये पोषक अनेक घटक असतात ज्यामुळे त्वचेला पोषक तत्वे मिळतात.
- तसेच चेहऱ्यावरचे काही डाग पुरळ असतील तर ते पटकन निघून जातील आणि चेहरा तजेलदार होईल.
- चेहऱ्यावर छानशी चमक दिसून येईल.

- क्लीन्सरप्रमाणेच, मॉइश्चरायझर्स प्रत्येकासाठी उपयुक्त असते.
- बऱ्याच महिलांची त्वचा हि तेलकट असते त्यामुळे अनेक वेळा त्वचेचे नुकसान होते. आणि म्हणूनच मॉइश्चरायझर्स त्वचा कोरडी होण्यापासून रोखते.
- तसेच जर तुमची त्वचा हायड्रेटेड आणि गुळगुळीत होत असेल तर त्या त्वचेला थोडासा ओलसरपणा यावा यासाठी मॉइश्चरायझर अत्यंत आवश्यक आहे.

4. घरा बाहेर पडताना सनस्क्रीन लावा-
- सध्या प्रचंड उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाच्या किरणांचा डायरेक्ट प्रभाव आपल्या स्किनवर दिसून येतो.
- ऑफिसला जाताना दररोज सनस्क्रीन लावणे फायदेशीर राहील.
- सनस्क्रीन निवडताना UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून संरक्षण होईल असं बघून घ्या.
- तसेच जर तुम्हाला जास्तच स्किनचा काही त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सनस्क्रीन वापरा.

5. चेहऱ्याला सीरम लावणे-
- बाहेर पडताना चेहऱ्याला सिरम लावणे फायदेशीर राहील.
- चेहऱ्याच्या त्वचेसाठी सीरम उपयुक्त आहे.
- सिरममध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि रेटिनॉल सारखे घटक असतात जे त्वचेसाठी फायद्याचे आहेत.
- उन्हामध्ये चेहऱ्याला लालसरपणा येतो त्यासाठी सिरम लावणे गरजेचे आहे.
