सलवार सूट घालणं तसं प्रत्येकाला आवडतं. यामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या सुंदर पॅटर्न्स, डिझाइन्स आणि कलर कॉम्बिनेशन्स पहायला मिळतात. लेटेस्ट डिझाइन्सबद्दल बोलायचे झाल्यास सध्या कलमकारी प्रिंटला सर्वात जास्त पसंती दिली जात आहे.
कलमकारी डिझाइनमध्ये डेली वेयरपासून ते पार्टी लूकपर्यंत अनेक सूट डिझाइन्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. पाहूयात कलमकारी प्रिंट असलेल्या लेटेस्ट डिझाइन्स कोणत्या आहेत आणि त्यांना आपण स्टायलिश लूक कसा देऊ शकतो याबद्दल.
फ्रॉक स्टाइल सूट :
फ्रॉक स्टाइलमध्ये तुम्हाला अनेक कलमकारी डिझाइन्स आणि प्रिंटस पहायला मिळतील. याप्रकारचे सूटस् सध्या रंगीत अर्थात कलरफुल किंवा मल्टीकलर कॉम्बिनेशनमध्ये खूप पहायला मिळत आहेत. स्टाइलबाबत बोलायचे झाल्यास तर हा लूक तुम्हाला मॉडर्न लूक देण्याचं काम करेल.
डेली वेयर सूट :
नियमितपणे घालण्यासाठी अशाप्रकारच्या कॉटन फॅब्रिक असलेले सिंपल सूट तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतील. ऑफिस लूकसाठी तुम्ही हेवी लूक देऊ शकणारे बोहो स्टाइलचे मल्टी कलरच्या इयररिंग्सही यावर ट्राय करू शकता. प्रिंट आणि पॅटर्नचे हे कॉम्बिनेशन सिंपल लूकलाही स्टायलिश बनवण्यात मदत करतात.
कुर्ती स्टाइल सूट :
कुर्ती स्टाइल सूट आजकाल आपल्याला बाजारात रेडीमेड पहायला मिळतात. स्टायलिश लूक तुम्हाला कॅरी करायचा असेल तर तुम्ही रेडीमेड प्लेन पलाझो घालू शकता. याप्रकारचे प्रिंटेड सूट तुम्हाला मार्केटमध्ये 500 रूपयांपर्यत सहज मिळू शकतील. लूक कंप्लिट करण्यासाठी तुम्ही यावर सिल्व्हर ज्वेलरीही घालू शकता. यामध्ये तुम्हाला अनेक डिझाइन्स पहायला मिळू शकतील.
हेही वाचा : Wedding Makeup Look : वेडिंगला ग्लॅमरस मेकअप करा ट्राय
Edited By – Tanvi Gundaye