ऑयली स्किन असणारे लोक कायम त्यांच्या त्वचेच्या संबंधित समस्यांनी हैराण झालेले दिसतात. कारण ऑयली स्किन असेल तर त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. आयुर्वेदानुसार, ऑयली त्वचेच्या सर्व प्रकारच्या समस्यांपासून सुटका होण्यासाठी चंदन पावडर वापरणे फायद्याचे ठरते. चंदन थंड, तेल शोषक आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. त्यामुळे तेलकट त्वचेच्या समस्येवर चंदन पावडरचा वापर करणे प्रभावी मानले जाते. तुम्ही चंदनाचे फेस पॅक ऑयली स्किनसाठी वापरू शकता. याव्यतिरिक्त टोनर, स्क्रबर बनवू शकता. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात ऑयली स्किनसाठी चंदन पावडरचा वापर कसा करायचा.
चंदनाचा स्क्रबर –
साहित्य –
- चंदन पावडर – अर्धा चमचा
- बेसन – अर्धा चमचा
- गुलाबपाणी
कृती –
- एका भांड्यात चंदन पावडर, बेसन मिक्स करावे. यात पेस्ट तयार होईल इतके गुलाब पाणी मिक्स करावे.
- तयार पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि गोलाकार पद्धतीने हळूवारपणे स्क्रब करावी.
- 10 मिनिटे चेहऱ्यावर लावावे.
- 10 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.
चंदनाचा टोनर –
साहित्य –
- गुलाबजल – 1 कप
- चंदन पावडर – 1 चमचा
कृती –
- सर्वात आधी एक कप पाण्यात गुलाबपाणी एक चमचा चंदन पावडर मिक्स करून घ्या.
- तयार टोनर स्प्रे बॉटलमध्ये भरा.
चंदन फेस मास्क –
साहित्य –
चंदन पावडर – 1 चमचा
मुलतानी माती – 1 चमचा
गुलाबपाणी –
कृती –
फेसमास्क बनवण्यासाठी एका भांड्यात चंदन पावडर, मुलतानी माती मिक्स करावी.
त्यात गरजेनुसार पाणी घालावे आणि त्याची पेस्ट बनवावी.
चेहऱ्यावर तयार पेस्ट 10 ते 15 मिनिटे लावून ठेवावी.
10 ते 15 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.
हेही पाहा –