जर तुमची स्किन ऑईली असेल तर हिवाळ्याचा ऋतू हा खास तुमच्यासाठी आहे. कारण हिवाळ्यातही तुमच्या चेहऱ्यावर एक खास प्रकारची चमक असते. परंतु हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या स्किन केअरच्या वेगवेगळ्या व्हिडीओज् मुळे आपण आपल्या चेहऱ्यावर काहीही प्रयोग करून पाहण्यासाठी तयार होतो. परंतु असे करू नये. यामुळे चेहऱ्यावर त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात.
गरजेपेक्षा जास्त अॅलोवेरा जेल लावू नये :
थंडी , उन्हाळा किंवा पावसाळा अगदी कोणत्याही परिस्थितीत चेहऱ्यावर अॅलोवेरा जेल लावणे उपयुक्त समजले जाते. त्वचेसाठी हा रामबाण उपाय समजला जातो. परंतु हे खरंच सत्य आहे का ? कारण अॅलोवेरा जेल सर्वांच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकेल असं अजिबात नाही. यासाठी तुम्ही पॅच टेस्ट करू शकता. बाजारात मिळणाऱ्या अॅलोवेरा जेलमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स, प्रिझर्व्हेटिव्हस आणि सेंट असतात. अशात याचा जास्त उपयोग ऑयली स्किनवर कधीकधी चुकीचा ठरू शकतो. जरी तुम्ही नैसर्गिक अॅलोवेरा जेल लावत असलात तरी अनेकांच्या चेहऱ्याला हे सूट होऊ शकत नाहीत. अशात या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं की अॅलोवेरा जेल एका मर्यादेपेक्षा जास्त लावू नये. यामुळे एक्ने प्रोन स्किनचेही नुकसान होऊ शकते.
दिवसातून अनेकदा चेहरा धुऊ नका :
लोकांना असं वाटतं की ऑईली स्किन असल्यामुळे दिवसातून अनेकदा चेहरा धुणं ही सामान्य गोष्ट आहे. परंतु तसे नाही. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला ऑईल फ्री ठेवण्यासाठी तो सतत धुवत असाल तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील अडथळे दूर करत आहात यामुळे तुमची त्वचा अधिकच ऑईल प्रोड्युस करू लागते.
यासाठी चेहरा दिवसातून जास्तीत जास्त तीन वेळा धुवावा. यापेक्षा जास्त वेळा चेहरा धुवू नये. जर तुम्हाला मुरुमांची समस्या भेडसावत असेल तर जास्त वेळा चेहरा धुतल्याने चेहऱ्याची त्वचा इरिटेट होऊ लागते. यामुळे ओपन पोर्स आणि व्हाइट हेड्सची समस्या वाढू शकते.
योग्य विचार न करता अॅक्टिव्ह इंग्रीडियंट्सचा वापर करणे :
तुम्ही पाहिलं असेल की सोशल मिडिया इन्फ्लुएंसर्स वेगवेगळे प्रोडक्ट्स प्रमोट करत असतात. हायल्यूरानिक अॅसिड्स, नियासिनामाइड आणि सॅलिसिलिक अॅसिड हे तर प्रत्येक प्रोडक्टमध्ये असतातच. परंतु हे सर्व प्रोडक्ट्स प्रत्येक त्वचेसाठी सूट होतीलच असं नाही.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचे अॅक्टिव्ह इंग्रीडियंट्स वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. डर्मेटोलॉजिस्ट म्हणजेच त्वचारोग तज्ज्ञांकडून त्वचेच्या देखभालीसाठी नेमकी काय खबरदारी घ्यायची याबद्दल माहिती घेऊन मगच योग्य ते प्रोडक्ट निवडा.
हेही वाचा : Beauty Tips : केस आणि त्वचा दोन्हीसाठी फायदेशीर तेल
Edited By – Tanvi Gundaye