Friday, January 17, 2025
HomeमानिनीHealthभेंडीची भाजी करते अनेक आजार दूर

भेंडीची भाजी करते अनेक आजार दूर

Subscribe

कारल्याप्रमाणेच भेंडी देखील अनेकांची नावडती भाजी आहे. भेंडीच्या चिकटपणामुळे अनेकजण ही भाजी खात नाहीत. पण ही भाजी खाण्याचे फायदे जाणून घेतल्यावर नक्कीच तुम्ही याचे सेवन कराल. भेंडी अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. भेंडीमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, तांबे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, इत्यादी अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात.

भेंडीची भाजी खाण्याचे फायदे

Dry” Okra Curry - Edible New Mexico

  • भेंडी तुमचे हृदय स्वस्थ ठेवते. यात उपस्थित पॅक्टिन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. तसेच विरघळणारे फायबर, रक्तात कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो, ज्याने हृदय रोगाचा धोका कमी होतो.
  • कोलन कँसरला दूर करण्यासाठी भेंडी खूप फायदेशीर आहे. आतड्यांमध्ये उपस्थित विषारी तत्त्वांना बाहेर काढण्यास भेंडी मदत करते, ज्याने तुमच्या आतडी स्वस्थ राहतात आणि उत्तम प्रकारे काम करतात.
  • भेंडीत आढळणारा लसदार पदार्थ हाडांसाठी खूप उपयोगी असतो. यात असणारे व्हिटॅमिन-के हाडांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात.

Refrigerator Pickled Okra Recipe

  • भेंडी भरपूर फायबर असणारी भाजी आहे. यात असणारे फायबर पचन तंत्रासाठी फायदेशीर असतो. यामुळे पोटफुगी, कब्ज, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.
  • भेंडीत फोलेट नावाचा एक पोषक तत्त्व असतो जो गर्भाच्या मस्तिष्काचा विकास करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.
  • भेंडी तुमचे वजन कमी करण्यात मदत करते. तसेच तुमच्या त्वचेला सुंदर बनवतो.
  • भेंडीतील यूगेनॉल मधुमेहसाठी फारच फायदेशीर असतो. हा शरीरात ग्लोकोजच्या स्तराला वाढवण्यापासून बचाव करतो.

हेही वाचा :

डायबिटीजच्या रुग्णांसाठी उन्हाळ्यातील पोषक आहार

Manini