Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल जुने कपडे फेकताय? थांबा! असा करा त्यांचा रियूज

जुने कपडे फेकताय? थांबा! असा करा त्यांचा रियूज

Subscribe

जर तुमच्या घरी असलेल्या वस्तू रियुज करता येऊ शकतात. यामुळे तुमची बचत होईलच पण पर्यावरण ही सुरक्षित राहण्यास मदत मिळेल. बहुतांश लोक आपले जुने कपडे जाळतात किंवा फेकून देतात. अशातच तुम्ही असे कपडे पुन्हा वापरु शकता. मात्र स्मार्ट पद्धतीने ते कसे पुन्हा वापरायचे याच बद्दलच्या काही टीप्स आपण पाहणार आहोत. (Old cloth reuse ideas)

पायपुसणी जुने कपडे फेकून देण्याऐवजी त्याची पायपुसणी तयार करू शकता. घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सर्वजण घरात पायपुसणी वापरतोच. अशातच जुने कपडे वापरुन त्याची तुम्ही पायपुसणी तयार करु शकता. यासाठी कपडे गोलाकार, चौकोनी किंवा तुम्हाला ज्या आकारात पाहिजेत त्यानुसार एकमेकांमध्ये गुंडाळा आणि त्याची पायपुसणी तयार करु शकता.

- Advertisement -

जुन्या कपड्यांपासून बॅग बहुतांश लोक बॅग्सचा वापर करतात. सध्या काही ट्रेंन्डी बॅगचा अधिक वापर वाढला गेला आहे. तुम्ही बॅग्स बनवण्यासाठी जुन्या कपड्यांचा वापर करु शकता. जर तुम्हाला अधिक सामान उचलायचे असेल तर अधिक मजबूत कापडाचा वापर करा.

वॉशिंग मशीनचे कव्हर वॉशिंग मशीनचे कव्हर तुम्हाला ती खराब होण्यापासून दूर ठेवू शकते. त्याचसोबत ती अस्वच्छ सुद्धा होत नाही. प्रयत्न करा की, चादर सारख्या कपड्यांचा वापर वॉशिंग मशीनचे कव्हर तयार करण्यासाठी वापरु शकता.

- Advertisement -

फ्रिज हँन्डल  या सर्व गोष्टींव्यतिरिक्त तुम्ही खराब कापडाचा वापर फ्रिजचे हँन्डल तयार करण्यासाठी करु शकता. फाटलेल्या कापडावर बटण लावून तुम्ही कव्हर तयार करु शकता.


हेही वाचा- कपड्यावर लागलेले घामाचे डाग असे हटवा

- Advertisment -