प्रत्येक स्त्रिला आपले केस लांबसडक, चमकदार आणि घनदाट असावेत असे वाटतं. अनेक स्त्रिया आपले केस सुंदर दिसावे याकरता विविध उपाय देखील करतात. मात्र, ‘ऑलिव्ह ऑईल’ हा एक सर्वात उत्तम असा पर्याय आहे. ज्यामुळे तुमचे केस लांबसडक आणि सुंदर राहण्यास मदत होते.
केसांच्या सौंदर्यासाठी ऑलिव्ह ऑईल
- हेअर कंडिशनर
आपले केस कोरडे झाले असतील तर ऑलिव्ह ऑईल हा त्यावर एक उत्तम उपाय आहे. केसाला ऑलिव्ह ऑईल लावल्याने केसाला उत्तम कंडिशनर होण्यास मदत होते. थोडेसे ऑलिव्ह ऑईल तेल तळहातावर घेऊन ते केसाला चोळावे त्यामुळे केस मुलायम आणि सिल्ही होण्यास मदत होते.
- कोंडा दूर होतो
ऑलिव्ह ऑईल एक अँटी ऑक्सीडेंटचे काम करते. केसात जर कोंडा झाला असले तर साध्या खोबरेल तेलामध्ये थोडेसे ऑलिव्ह ऑईल एकत्र करुन केसांना लावल्यामुळे कोंडा दूर होतो.
- केस हेल्दी होण्यास मदत
जर आपण केसांसाठी होममेड ट्रीटमेंट घेऊ इच्छिता तर ऑलिव्ह ऑईल बेस्ट आहे. ते आपले केस हेल्दी करतात.
- केसांना नैसर्गिक ओलावा
ऑलिव्ह ऑईलमध्ये मोनो सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते. जे केसांना नैसर्गिक ओलावा देते.
- त्वचेतील ओलावा टिकून राहतो
ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठीही फायद्याचे आहे. ऑलिव्ह ऑईलने मालिश केल्यास त्वचेतील ओलावा टिकून राहतो.