घरताज्या घडामोडीOmicron Affects Throat: ओमिक्रॉनने घशातील खवखव कमी करण्यासाठी खा 'हे' पदार्थ

Omicron Affects Throat: ओमिक्रॉनने घशातील खवखव कमी करण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

Subscribe

बऱ्याचदा आपण अनेक अन्नपदार्थ खातो. ज्यामुळे आपल्या घश्याला संसर्ग होण्याची शक्यता असते. खश्यात खवखव होणे हे ओमिक्रॉनचे नवे लक्षण आहे त्यामुळे घश्यातील खवखव वेळीच दूर करण्यासाठी काही सोपे उपाय नक्की ट्राय करा.

देशात कोरोना व्हायरसच्या (corona Virus) नव्या ओमिक्रॉन व्हायरसने (Omicron  Variant) थैमान घातले आहे. ओमिक्रॉनच्या लक्षणांनी देशातील नागरिकांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. सर्दी, ताप ही ओमिक्रॉनची प्राथमिक लक्षणे होती मात्र आता खशात खवखव होणे हे ओमिक्रॉनचे नवे लक्षण समोर आले आहे. (Omicron Affects Throat)  ओमिक्रॉनच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये खशात खवखव होणे हे पहिले लक्षण आहे. त्यामुळे यासारखी कोणतीही प्राथमिक लक्षणे आढल्यास त्वरित कोरोना चाचणी करुन घेणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, खोकला, डोकेदुखी, घसादुखी, श्वास लागणे, अंग दुखणे त्याचप्रमाणे ताप येणे ही लक्षणे कोरोना आणि ओमिक्रॉनची लक्षणे आहेत. या काळात आपण आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा आपण अनेक अन्नपदार्थ खातो. ज्यामुळे आपल्या घश्याला संसर्ग होण्याची शक्यता असते. खश्यात खवखव होणे हे ओमिक्रॉनचे नवे लक्षण आहे त्यामुळे घश्यातील खवखव वेळीच दूर करण्यासाठी काही सोपे उपाय नक्की ट्राय करा.

- Advertisement -

आलं

घश्याच्या खवखवीवर आल्याचा रस किंवा आले पाक खाणे कधीही उत्तम. घश्याची खवखवच नाही तर सर्दी खोकल्यावरही आले औषध म्हणून काम करते. आल्याचे सेवन करणाऱ्यांना कॅन्सर कमी धोका असतो. सकाळी आले घातलेला चहा किंवा आल्याच्या सरबताचे तुम्ही सेवन करू शकता.

- Advertisement -

हळद

 turmeric water

 

हळद ही आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. हळदीचे महत्त्व आपल्याला आयुर्वेदातही सांगितले आहे. हळदीमध्ये इंन्फेक्शन रोखणारे महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे आपल्या आहारात हळदीचा समावेश करणे फायद्याचे आहे. घशात खवखव होत असेल कोमट पाण्यात हळद टाकून त्याने गुळण्या केल्यास आराम मिळतो. त्याचप्रमाणे रात्री झोपताना हळदीचे पाणी किंवा हळदीचे दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

मध 

मध हे देखील फार आरोग्यदायी आहे. एखाद्या व्हायरस किंवा विषाणूवर मात करण्यासाठी मध प्रभावी असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. मध हा गरम पदार्थ आहे त्यामुळे हिवाळ्यातही मधाचे सेवन करणे उत्तम मानले जाते. मधामुळे शरिरात उष्णता निर्माण होते.

चहा

घश्याची खवखव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचे सेवन तुम्ही करू शकता. आल्याचा चहा, गवती चहा, ग्रीन टी अशाप्रकारे अनेक चहाचे सेवन करू शकता. गरम पदार्थ प्यायल्याने खशाला आराम मिळतो.

स्मूथी

घशात खवखव होत असेल तर इतर कोणतेही जड पदार्थ गिळणे जमत नाही. अशा वेळी हलके पदार्थ खाणे कधीही चांगले. स्मूथी म्हणजेच लिक्विड फॉममधील कोणताही पदार्थ तुम्ही खाऊ शकता. ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची पेज किंवा स्मूथी तुम्ही खाऊ शकता. याने घशाला आराम मिळेल.

हे पदार्थ खाऊ नका

घसा खवखवत असेल तर थंड पदार्थ, फ्रीजचे पाणी पिणे टाळा. त्याचप्रमाणे सोडा, कॉफी पिणे टाळा. घसा खवखवत असताना दारू पिणे कधीही वाईट याने घश्याची खवखव आणखी वाढू शकते. तेलकट पदार्थ आणि अँसिटीक पदार्थ जसे की, संत्र, लिंबू,टोमॅटो हे पदार्थ खाणे टाळा.


हेही वाचा – या घरगुती उपायांमुळे सर्दी खोकला, घशातील खवखव पासून मिळेल आराम

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -