Omicron Variant: ओमक्रॉनपासून बचाव करण्यासाठी घरी करा ‘या’ ५ एक्सरसाईज

omicron covid-19 immunity boosting 5 exercise
Omicron Variant: ओमक्रॉनपासून बचाव करण्यासाठी घरी करा 'या' ५ एक्सरसाईज

काही लोकांना जीममध्ये जाऊन एक्सरसाईज करायला आणि काहींना खुल्या मैदानात जाऊन रनिंग करायला खूप आवडते. परंतु कोरोनाच्या काळात घरातून बाहेर पडणे धोकादायक झाले आहे. बरेच लोकं जे एक दिवस जीमला जाता राहू शकत नाही, ते लोकं आता कुटुंबियांच्या काळाजीपोटी जीममध्ये जात नाहीयेत. त्यामुळे आता बऱ्याच लोकांनी होम वर्कआऊटची पद्धत अवलंबली आहे. कोरोनाच्या गेल्या दोन लाटेमध्ये जेव्हा जीम बंद होत्या, तेव्हा सर्व लोकांनी होम एक्सरसाइज करून आपले शरीर सदृढ आणि मेंटेन ठेवले होते.

या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञांकडून रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्याचा सल्ला दिला जात आहे. हॉवर्ड युनिव्हर्सिटीनुसार, दररोज एक्सरसाईज केल्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत होते. त्यामुळे घरीच काही एक्सरसाईज करून रोग प्रतिकारकशक्ती मजबूत केली जाऊ शकते. ओमिक्रॉन आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी चांगली रोग प्रतिकारकशक्ती मदत करते. त्यामुळे आम्ही तुम्हाला रोग प्रतिकारकशक्ती मजबूत बनवण्यासाठी दररोज कोणत्या ५ एक्सरसाईज केल्या पाहिजेत, हे सांगणार आहोत.

एक्सरसाईज करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्हाला सांगितलेल्या एक्सरसाईज सकाळी किंवा संध्याकाळी केल्या जाऊ शकतात. खाली ज्या ५ एक्सरजाईज सांगितल्या आहेत, त्या ४-४ मिनिट करू शकता. ५ एक्सरजाईज करण्यासाठी २० मिनिटे लागतील. सुरुवातीला २ मिनिटे करून त्यानंतर हळूहळू वेळ वाढवत जा, नाही तर अधिक थकवा येऊ शकतो. जर कोणाला आरोग्यासंबंधित समस्या असेल किंवा शरीराच्या कोणत्याही भागात जखम झाली असेल, तसेच पहिल्यांदा एक्सरसाईज करत असाल तर तुम्ही सर्टिफाईज फिटनेस एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि त्यानंतर एक्सरसाईज करा.

१) रशी उडी (Skipping)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tobie (@tobie.jumps)

रशी उडी ही सर्वात सोप्पी एक्सरसाईज आहे, जी घराच्या घरी करू शकता. रशी उड्या मारल्यामुळे खूप साऱ्या कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. विविध डेटानुसार, १५ ते २० रशी उडी मारल्यामुळे २५०-३०० कॅलरीज बर्न होऊ शकतात. ही एक्सरसाईज करताना लक्षात ठेवा की, तोंडावाटे श्वास घेऊ नका आणि शरीर सरळ ठेवा. तसेच उडी मारताना गुडघे वाकवू नका, सरळ पाय ठेवा.

२) पुश-अप (Push Ups)

 

View this post on Instagram

 

A post shared by Can I Do CrossFit? (@canidocrossfit)

पुश-अप करणे ही बेसिक एक्सरसाईज आहे आणि मोठ्यातला मोठा बॉडीबिल्डरसुद्धा ही एक्सरसाईज करतो. ही बॉडी वेट एक्सरसाईज आहे, जी पुरुष आणि महिला दोन्ही करू शकतात. ही एक्सरसाईज केल्यामुळे छाती, खांदा, हात, पोट इत्यादींवर ताण येतो.

ही एक्सरसाईज करताना हे लक्षात ठेवा की, हात खांद्यापासून बाहेरच्या दिशेला ठेवा, डोक शरीराच्या समान असावे आणि पोट टाईट ठेवा. ही एक्सरसाईज केल्याममुळे शरीरात ताकद वाढते. छातीवर स्नायूंची वाढ होते, छातीला आकार मिळतो आणि कॅलरीज बर्न होतात.

३) बर्पी (Burpee)

 

View this post on Instagram

 

A post shared by Zahíra Colón Collazo (@ydelise)

बर्पी खूप चांगली बॉडी वेट एक्सरसाईज आहे, जी शरीराच्या वजनाप्रमाणे करावी लागते. १ बर्पी केल्यामुळे २ कॅलजरी बर्न होतात. बर्पी करण्याची पद्धत वरील व्हिडिओत पाहू शकता. या एक्सरसाईजमुळे स्ट्रेंथ आणि स्टेमिना वाढवते. ही एक्सरसाईज करताना तोंडातून श्वास घेऊ नका, नाही तर अधिक थकवा येऊ शकतो.

४) पुल-अप (Pull-ups)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shekar Nad (@shekarnad)

पुल-अप बॉडी वेट एक्सरसाईज आहे. इतर एक्सरसाईजपेक्षा ही एक्सरसाईज थोडी कठीण आहे. कारण या एक्सरसाईजमध्ये शरीराचे वजन हातावर घ्यावे लागते. ही एक्सरसाईज घरातील उंच रेलिंग, खोलीत, हॉल किंवा छताच्या गेटवरच्या निघालेल्या भागाला पकडून केली जाऊ शकते. ही एक्सरसाईज करताना लक्षात ठेवा की, जर तुम्ही पूर्ण वरती जाऊ शकत नसला तर पहिल्यांदा अर्धेवरती जा आणि त्यानंतर शरीर हळूहळू पूर्णवरती जाण्याचा प्रयत्न करा. पुल-अप करताना पोट टाईट ठेवा आणि हात खांद्याच्या बाहेर असावे.

५) स्टेअर्स क्लाइंबिंग (Stair climbing)

स्टेअर्स क्लाइंबिंग म्हणजे पायऱ्या चढणे ही खूप चांगली होम एक्सरसाईज आहे. या एक्सरसाईजमुळे कॅलरीज बर्न होतात, शिवाय पायाचे स्नायूही मजबूत होतात. स्टेअर्स क्लाइंबिंग करताना ग्रिपवाले शूज घाला. ही एक्सरसाईज केल्यामुळे हार्ट रेट वाढेल आणि अधिक कॅलरीज बर्न होईल. परंतु जर अधिक थकवा लागत असेल तर हळूहळू ही एक्सरसाईज करा.


हेही वाचा – Omicron Variant: कोरोनातून लवकर बरे व्हायचेय, तर ‘या ‘५ गोष्टींचे सेवन करा