Omicron Diet : कोरोनाच्या संसर्गानंतर ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश

आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी एक्सपर्ट काही डाएट फॉलो करायला सांगतात. जेणेकरुन, कोरोनापासून तुमचा बचाव होईल.जर तुम्हालाही कोरोनाची लक्षणं दिसण्यास सुरुवात झाली असेल तर, जाणून घ्या यावेळी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा लागेल.

Omicron Diet: Include 'these' substances in the diet after corona infection
Omicron Diet : कोरोनाच्या संसर्गानंतर 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले आहे. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दिवसांत आरोग्याची काळजी घेणे हा मोठा टास्क ठरला आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी एक्सपर्ट काही डाएट फॉलो करायला सांगतात. जेणेकरुन, कोरोनापासून तुमचा बचाव होईल.जर, तुम्हालाही कोरोनाची लक्षणं दिसण्यास सुरुवात झाली असेल तर, जाणून घ्या यावेळी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा लागेल.

प्रथिने आणि कॅलरीज

जर तुमचे शरीर विषाणूशी लढण्यासाठी पुरेसे सामर्थ्य गोळा करू शकत नसेल, तर कॅलरी आणि प्रथिने यावर लक्ष केंद्रित करा. प्रोटीनसाठी तुम्ही अंडी, मासे आणि मसूर यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करू शकता. जर तुम्हाला भूक लागत नसेल तर तुम्ही केळी, नट बटर, बिया आणि शेंगा देखील खाऊ शकता. एवोकॅडो, चीज, ऑम्लेट यासारख्या पदार्थामधून शरीराला पुरेशा प्रमाणात कॅलरीज मिळू शकतात.

मसाल्याचे पदार्थ

एखाद्या पदार्थाचे चव आणि गंध गमावणे हा कोरोनाचे मुख्य लक्षण आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आहारातील लसूण,आले आणि काळी मिरी यांसारख्या गोष्टी ज्याप्रकारे जेवणाची चव वाढवते. त्याप्रमाणे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवते.

फ्रोझन फूड 

कोविड-19 च्या पुनर्प्राप्तीदरम्यान अनेकांना थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत शरीर पूर्ण क्षमतेने विषाणूंशी स्पर्धा करू शकत नाही. फ्रिजमध्ये ठेवलेली फळे आणि भाज्या ही ताजी फळे आणि भाज्यांइतकीच पौष्टिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


हे ही वाचा – Ajwain kadha- ओव्याचा काढा प्यायल्याने सर्दी खोकलाच नाही तर सांधेदुखीही होईल दूर