Omicron Variant: कोरोनातून लवकर बरे व्हायचेय, तर ‘या ‘५ गोष्टींचे सेवन करा

omicron variant covid 19 patients should eat these 5 foods during corona recovering
Omicron Variant: कोरोनातून लवकर बरे व्हायचेय, तर 'या '५ गोष्टींचे सेवन करा

जीवघेण्या कोरोना महामारीचे हे अखेरचे वर्ष असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने २०२२मध्ये कोरोनाचा अंत होईल असे भाकीत केले होते. पण सध्या जगावर कोरोनाच्या नव्या रुपाचे संकट घोंघावत आहे. कोरोनातून लवकर बरे व्हायचे असेल तर डाएट सर्वात महत्त्वाचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे आज आपण कोरोनातून लवकर बरे व्हायचे असेल तर डाएटमध्ये काय सेवन करायला पाहिजे हे जाणून घेणार आहोत.

चणे आणि मासे – कोरोनातून बरे होण्यासाठी डॉक्टरांनी डाएटमध्ये भोपळ्याच्या बिया, काजू, चणे आणि मासे यांसारख्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. यामधील असलेले खनिज जस्त बरे होण्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. तसेच या पदार्थात मायक्रोन्यूट्रिएंट अँटीऑक्सिडेंट, अँटी व्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीसारखे गुणधर्म असतात, जे व्हायरल मल्टीपल होण्याची क्षमता आणि गंभीर लक्षणांना रोखतात.

आंबट फळे – शरीरात रोगांसोबत लढणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीला निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन-सी सर्वात जास्त प्रभावी असते. याला एस्कॉर्बिक अॅसिड म्हटले जाते. पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन-सी अँटिऑक्सिडंट्समध्ये भरपूर असते, जे रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्याचे काम करते. त्यामुळे व्हिटॅमिन-सीसाठी आंबट फळे, हिरव्या रंगाच्या पानांच्या भाज्या, पेरू, किवी, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी आणि पपईचे सेवन करा.

अंडी आणि मशरुम – मे २०२१मध्ये नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, कोरोना रुग्णांना बरे होण्यासाठी व्हिटॅमिन-डी खूप उपयोगी असल्याचे मानले गेले आहे. अभ्यासानुसार, व्हिटॅमिन-डी असलेले पदार्थ कोरोनातून बरे होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. त्यामुळे कोरोनातून बरे होण्यासाठी डाएटमध्ये मशरुम, अंडी, दही आणि दूध यासारख्या पदार्थांचा समावेश करा.

डाळ आणि मासे – प्रथिने स्नायूंना बळकट करताना खराब झालेल्या पेशी दुरुस्त करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. कोरोनातून बरे होण्यासाठी प्रथिने म्हणून फायदेशीर असतात. त्यामुळे प्रथिने मिळवण्याचा सर्वात चांगला स्रोत बियाणे, बदाम, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, चिकन, अंडी आणि मासे असल्याचे मानले जाते.

नैसर्गिक अँटीव्हायरल अन्न – हिवाळ्याच्या दिवसात खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी नैसर्गिक अँटीव्हायरल अन्न जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे. तुळस, आले, काळी मिरी, लंवग आणि लसूण यांसारख्या गोष्टी खूप फायद्याच्या आहेत. कोरोनातून बरे होण्याच्या काळात या पदार्थांचा काढा बनवून पिऊ शकता.

पेय पदार्थ – आजारापणा दरम्यान ताकद आणि शक्तीसाठी बॉडी हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे असते. आरोग्यदायी पेय तुमच्या शरीराला फक्त मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स देत नाही तर विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढण्यास मदत करतात. त्यामुळे कोरोना रिकव्हरी दरम्यान नारळाचे पाणी, आवळ्याचा ज्यूस, संत्र्याचा ज्यूस, भाज्यांच्या ज्यूस याचे सेवन करा. यादरम्यान शरीरात पाण्याची कमतरता अजिबात होऊ देऊ नका.


हेही वाचा – Delhi Corona Blast: संसद भवनात कोरोनाचा विस्फोट; ४००हून अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह