घरताज्या घडामोडीOmicron variant : ओमीक्रॉनचा सामना करायचाय? मग या सवयी बदला

Omicron variant : ओमीक्रॉनचा सामना करायचाय? मग या सवयी बदला

Subscribe

भारतात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क लावणे,सतत हात धुणे याशिवाय सोशल डिस्टेंसिंगचे पालन या त्रिसुत्री नियमांचे पालन करुन कोरोनासारख्या महामारीवर मात करु शकता.याशिवाय तुमच्या आहारात बदल करुन रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकता.

गेले दोन वर्षे संपूर्ण जगावर कोरोनाचे थैमान सुरु होते.त्यानंतर  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन आता पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होत आहे.भारतात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क लावणे,सतत हात धुणे याशिवाय सोशल डिस्टेंसिंगचे पालन या त्रिसुत्री नियमांचे पालन करुन कोरोनासारख्या महामारीवर मात करु शकता.याशिवाय,प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती ही वेगळी असते.तुमची रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी तुमच्या काही सवयींमध्ये बदल करुन कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा तुम्ही सामना करु शकता.

  • शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीरातील पांढऱ्या पेशी मजबूत करणे गरजेचे आहे.त्यामुळे आहारात फळे आणि भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. यामध्ये बीटा – कॅरोटीन,जीवनसत्त्व ए,सी आणि ई सारखे पोषकतत्त्व असतात.भाज्या आणि फळे सेवन केल्याने शरीराला संसर्गाशी लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशी तयार करते.
  • पुरेशी झोप न मिळाल्यास तुम्हाला ओमिक्रॉनचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा सायटोकाइन्स नावाचे प्रथिने बाहेर पडतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.त्यामुळे झोप पूर्ण होणे गरजेचे आहे.
  • धुम्रपान केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.तंबाखूजन्य पदार्थातील रसायनामुळे शरीरची हानी होऊ शकते.
  • अतिरिक्त तणाव घेतल्यानेही तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते.तणाव आणि कोणत्याही गोष्टीची चिंता 30 मिनिटांत तुमची प्रतिकारक्षमता कमतकुवत करु शकते.त्यामुळे योगा आणि ध्यान करणे गरजेचे आहे.
  • याशिवाय चरबीयुक्त पदार्थांचा समावेश आहारात केल्याने तुमची प्रतिकारशक्ती कमजोर होऊ शकते.
  • मजबूत हाडे आणि निरोगी रक्त पेशींसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे आणि ते व्हिटॅमिन डी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करते.त्यामुळे आहारात अंडी,मासे अशी व्हिटॅमिन डी असणाऱ्या पदार्थांचा समावेश करु शकता.

हेही वाचा – Katrina लग्नानंतर हॉट अवतारात, ओव्हर साइज स्वेटर अन् मंगळसूत्राने वेधले लक्ष

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -