घरलाईफस्टाईलअक्रोड खाल्याने नैराश्य कमी करण्यास मदत

अक्रोड खाल्याने नैराश्य कमी करण्यास मदत

Subscribe

अक्रोड खाल्याने नैराश्य कमी होते असे एका संशोधनात सिद्ध झाले आहे.

अमेरिकेत अक्रोड खाल्याने नैराश्य कमी होते का? याविषयी संशोधन करण्यात आले आहे. लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनातून असे लक्षात आले आहे की, अक्रोड खाणाऱ्या लोकांमध्ये २६ टक्के नैराश्य प्रमाण कमी झाले आणि इतर ड्रायफ्रूटस खाल्याने ८ टक्के नैराश्य प्रमाण कमी झाले असे या संशोधनातुन समजले.

हे संशोधन न्यूट्रिएंट्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या अभ्यासात असे लक्षात आले की, इतर ड्रायफ्रूटस तुलनेने अक्रोड खाल्याने शरीरात ऊर्जाचे प्रमाण अधिक वाढते आणि एकाग्रतेत वाढ होण्यास अधिक मदत होते. विद्यापीठाचे प्रमुख संशोधक लोनॉरे अरब यांनी अस सांगितल की, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँन्ड प्रिव्हेंशन(सीडीसी) अनुसार संशोधनामध्ये अभ्यासासाठी घेतलेल्या सहा प्रोढांपैकी प्रत्येकाला कधीना कधी नैराश्य हे येणारच. त्यातुन बाहेर पडण्यासाठी खाण्या पिण्यात बदल करणे महत्वाचे आहे.

- Advertisement -

अरब यांनी सांगितले की, हृदय रक्त वाहिन्यांसंबंधीत आणि संज्ञानात्मक आरोग्यमध्ये अक्रोड या ड्रायफ्रूटची भूमिका काय आहे हे तपासले गेले होते आणि आता अक्रोडमुळे नैराश्य कमी होते आणि त्याचा निरोगी खाण्यात समाविष्ट करण्याच कारण प्रदान केले आहे. या संशोधनात अमेरीकेतील २६००० प्रोढांचा समावेश केला होता.

या संशोधनाचा निष्कर्ष असा निघाला की, अक्रोड खाल्याने त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होतो, ऊर्जा वाढते, निराशा कमी होते, अधिक आशावादी होतात हे संशोधनातुन सिद्ध झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -