Saturday, March 15, 2025
HomeमानिनीBeauty Tips : मजबूत केसांसाठी कांद्याचे तेल

Beauty Tips : मजबूत केसांसाठी कांद्याचे तेल

Subscribe

आपली केस मजबूत चमकदार आणि निरोगी राहण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो.आहार, योग्य जीवनशैलीत बदल करतो किंवा काही घरगुती उपाय करतो. केसांसाठी कांदा उत्तम घरगुती उपाय आहे. कांद्यात असलेले सल्फर आणि अँटीऑक्सिडंट्स केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी फायद्याचे असतात. आज आपण जाणून घेऊयात मजबूत केसांसाठी कांद्याचे तेल.

डँड्रफ पासून सुटका

कांद्यामध्ये अँटी बॅक्टरीअल आणि अँटिफंगल गुणधर्म असल्यामुळे केसातील डँड्रफ पूर्णपणे निघून जातो. कांद्याचा रस डँड्रफवर उपचार करण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी उत्तम आहे.

केस चमकदार होतात

केसांना चमकदार होण्यासाठी आणि केसांची वाढ सुधारण्यासाठी कांद्याचे तेल उत्तम आहे. या तेलामुळे केस स्मूद शायनी आणि सुंदर दिसतात. केसांना शॅम्पू करण्याआधी कांद्याचे तेल किंवा कांद्याचा रस केसांना लावल्याने केस चमकदार होतील.

हेअर ग्रोथ 

कांद्याच्या रसामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. कांद्यात सल्फर आणि अँटीऑक्सिडंट्स बरोबरच अनेक गुणधर्म असतात. ज्यामुळे केसांची वाढ चांगली हॊते.

काळे केस

कांद्याचा रस किंवा कांद्याचे तेल लावल्याने केस काळे आणि चमकदार होतात. यामुळे केस पांढरे देखील होत नाही.

घरी कसे बनवायचे कांद्याचे तेल

सर्वात प्रथम कांदा हा मिक्सरमध्ये बारीक पिसून घ्या. त्यानंतर चाळणीमध्ये गाळून घ्या.त्यानंतर कांद्याचा रस हा नारळाच्या तेलात मिक्स करून 15 ते 20 मिनिटे गरम करून घ्या. त्यानंतर केसांना चांगली मालिश करून घ्या. तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये याचा समेवश तुम्ही करू शकता.

ऑयली स्कॅल्प

जर तुमची स्कॅल्प ऑयली असले तर कांद्याचे तेल किंवा रस कमी वापरा. कांद्यामध्ये सल्फर असते ज्यामुळे त्वचेला जळजळ आणि खाज येऊ लागते. त्यामुळे जर तुमची त्वचा तेलकट असेल तर कांद्याचा रस केसांना लावू नका.

हेही वाचा : Health Tips : बाजरी की नाचणी कोणती भाकरी जास्त फायदेशीर ?


Edited By : Prachi Manjrekar

 

 

 

Manini