घरताज्या घडामोडीOnline Learning: ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म्सची तणाव घटवण्यात मोठी मदत,ब्रेनलीचे परिक्षण

Online Learning: ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म्सची तणाव घटवण्यात मोठी मदत,ब्रेनलीचे परिक्षण

Subscribe

जागतिक आरोग्य दिनानिमित्त पार पडलेल्या एका सव्हेत १,७६४ जणांवर सर्वेक्षण करण्यात आले.

कोरोना सारख्या विषाणूमुळे मुलांना ध्यानीमनी नसताना त्यांना ऑनलाईन शिक्षणाकडे वळावे लागले. ऑनलाईन शिक्षण म्हणजे टाईमपास, मुलांना काय कळत नाहीये अशा अनेक तक्रारी समोर आल्या. घरी राहून ऑनालाईन अभ्यास करण्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला हे जाणून घेण्यासाठी जगातील ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्म ब्रेनलीने भारतीय युझर्सवर एक परीक्षण केले आणि या परीक्षणात त्यांना ऑनलाईन लर्निंगचा तणाव घटवण्यासाठी मदत झाल्याचे समोर आले. ऑनलाईन अभ्यास करण्याचा मुलांच्या मनासिकतेवर नेमका कसा परिणाम झाला आणि त्यांना या सर्वेक्षणात काय म्हटले आहे पाहूयात.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त पार पडलेल्या एका सव्हेत १,७६४ जणांवर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्व्हेमधून विद्यार्थ्यांना आपल्या तणाव आणि मानसिक आरोग्याच्या चिंताचे कसे व्यवस्थापन करता येईल याची माहिती मिळवण्यात आली. यात त्यांना असे आढळून आले की, ७५ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यासामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यात बदल झाल्याचे समोर आले. कोरोनामुळे अचानक ऑनलाईन अभ्यास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांकडे या पर्यायाचा अवलंब करण्यापलिकडे काहीच नव्हते. ७१ टक्के विद्यार्थ्यांनी हा बदल अतिशय वेगाने झाला आणि त्यामुळे महिन्याभरातच त्याचा मानसिक आरोग्यवर परिणाम झाल्याचे सांगितले. तर ३० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाच्या तयारीमुळे आणि शाळेतील आपल्या कामगिरीमुळे चिंतेत वाढ झाल्याचे सांगितले.

- Advertisement -

तर ६३ टक्के विद्यार्थ्यांनी अभ्यासानिमित्ताने इंटरनेटचा वापर आणि स्क्रिन टाईममध्ये वाढ झाल्याचे सांगितले. आणि त्यामुळे मानसिक आणि शारिरीक तणाव वाढल्याची कारणे समोर आली. मानसिक ताण वाढल्यामुळे शारिरीक दृष्ट्या वजन वाढण्यासारख्या समस्या वाढल्या.

लॉकडाऊनच्या काळात मुले ऑनालाईन अभ्यास करत असताना त्यांना मित्र मैत्रिणींना भेटणे, शिक्षकांना भेटणे, ऐकमेकांशी काही गोष्टी शेअर करणे ऑनलाईन माध्यामांमुळे सोपे झाले. ऑनलाईन शिक्षणामुळे घरी राहून अभ्यास करताना तणाव कमी होण्यास मदत झाली.

- Advertisement -

ब्रेनलीचे प्रोडक्ट ऑफिसर राजेश ब्यासनी यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे विद्यार्थांना मानसिक आरोग्याच्या आजारांना सामोरे जावे लागले. घरी राहून त्यांच्यात एकाकीपणा आला होता. सुदैवाने ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी आपले शिक्षण,मित्रमैत्रीणी तसेच इतरांना भेटू शकले आणि हाच काळात विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रेरित आणि सहभागी होण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरला.

मानसिक आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी जवळपास ३५ टक्के विद्यार्थ्यांनी डॉक्टरी उपचार घेतले तर ५० टक्क्याहून अधिक विद्यार्थ्यांनी मित्र मंडळी, कुटुंबिय यांच्याशी संवाद साधला तर काहींनी कला संगीत, सोशल मीडिया, व्यायाम यासारख्या अक्टिव्हिटी करुन मानसिक तणाव दूर केला.


हेही वाचा – Diwali Faral : तळण्यात घाण्याचे तेलच उत्तम! आहार तज्ज्ञांचा सल्ला

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -