बऱ्याच लोकांना ओपन पोर्सची समस्या असते. त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ओपन पोर्स म्हणजे त्वचेवर असलेली मोठी छिद्रे त्वचेवर असलेली लहान छिद्रे श्वास घेण्यासाठी आणि नैसर्गिक तेल सोडण्यासाठी महत्त्वाची असतात. मात्र, कालांतराने ही छिद्रे मोठी होऊन चेहऱ्यावर ठळकपणे दिसू लागतात. हे ओपन पोर्स बंद करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. आज आपण जाणून घेऊयात कोणत्या घरगुती उपायांनी ओपन पोर्सची समस्या दूर होईल.
बर्फाचा वापर
ओपन पोर्सची समस्या कमी करण्यासाठी एक लहान बर्फ घ्या. तो कपड्यात चांगला गुंडाळून त्वचेवर हलक्या हाताने 1-2 मिनिटे मसाज करा. मसाज केल्यामुळे ओपन पोर्स घट्ट होतात आणि रक्ताभिसरण देखील सुधारते.
टोमॅटो रस
टोमॅटोचा रस काढून तो कापसाने चेहऱ्यावर लावून 10-15 मिनिटांनी धुवा.टोमॅटोमध्ये नैसर्गिक अॅस्ट्रिंजंट गुणधर्म असल्याने ओपन पोर्स घट्ट होतील. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे केल्याने ओपन पोर्सची समस्या दूर होईल.
मुळ्याचा ज्यूस
मुळ्याचा ताजा रस कापसाने चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा.हे त्वचा टाइट करण्यासाठी उपयुक्त आहे.
मध आणि लिंबू
1 चमचा मधामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी धुवा. हे त्वचा मॉइश्चरायझ करायला मदत करते.
बेसन आणि दही पॅक
2 चमचे बेसन आणि 1 चमचा दही एकत्र करून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी धुवा. त्वचेला घट्ट करते आणि ओपन पोर्सची समस्या कमी करते.
सफरचंदाचा रस
सफरचंद आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. सफरचंदांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. तसेच सफरचंदामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने आपली त्वचा हायड्रेट आणि तजेलदार राहते.
ग्रीन टी
ग्रीन टी त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अँटिऑक्सिडंटचे गुणधर्म असल्यामुळे रॅडिकल्सपासून संरक्षण करते. ग्रीन टी त्वचेला हायड्रेट करते आणि छिद्र बाहेर काढायला मदत करते.
या घरगुती उपायांनी ओपन पोर्सची समस्या दूर होईल.
हेही वाचा : Beauty Tips : हिवाळ्यात बॉडी एक्सफॉलिएशन आहे गरजेचे
Edited By : Prachi Manjrekar