बहुतांशजणांना चीज खायला आवडते. पराठे असो किंवा सँन्डविच सर्वामध्ये चीज टाकून खाणाऱ्या मंडळींची संख्या मोठी आहे. मात्र अधिक प्रमाणात चीज खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. त्याऐवजीच्या त्याला पर्याय म्हणून पुढील काही गोष्टी नक्की ट्राय करू शकता.
काजू चीजचा वापर
काजू चीज सहज मार्केटमध्ये उपलब्ध होत नाही. त्यामुळे तुम्ही ते घरच्या घरी बनवू शकता. यासाठी दोन कप काजू रात्रभर भिजवत ठेवा.त्यानंतर सकाळी मिक्सरमध्ये वाटण्यासाठी लिंबूचा रस, मीठ आणि लसूण टाका.
पेस्टोचा वापर
पेस्टो चीजप्रमाणे दिसत नाही. मात्र त्याची क्रिमी टेस्ट आणि फ्लेवर पदार्थाची चव अधिक वाढवतात. चीज ऐवजी तुम्ही पेस्टोचा वापर करू शकता. पेस्टो तुम्ही सँन्डविचला लावून खाऊ शकता.
चीजऐवजी हम्मसचा वापर
बहुतांश डिशेजमध्ये हम्मसचा वापर केला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढली जाते. जर तुम्ही चीज खात नसाल तर तुमच्या पदार्थात हम्मसचा वापर करू शकता.
जुकुनी चीज
जुकुनी चीज सुद्धा तुम्ही नॉर्मल चीजला पर्याय म्हणून खाऊ शकता. याला व्हेजिटेबल चीज असे सुद्धा म्हटले जाते.
हेही वाचा- काजूचा पदार्थांमध्ये असा सुद्धा करा वापर