संत्री हे आरोग्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील उत्तम आहे. संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C असते. जे आपल्या त्वचेसाठी खूप आवश्यक आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे गुणधर्म असतात. जे डाग आणि पिग्मेंटेशन कमी करायला मदत करते. संत्र्याचा नियमित आहार किंवा फेस पॅक त्वचेला नैसर्गिक चमक देते. आज आपण जाणून घेऊयात संत्री आपल्या त्वचेसाठी किती उत्तम आहेत.
संत्र्याचे फायदे ग्लोइंग स्किनसाठी
व्हिटॅमिन सी
ग्लोइंग स्किनसाठी संत्री खूप फायदेशीर आहे. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे त्वचेला पोषण देतात आणि तेज टिकवून ठेवतात.
डाग कमी करणे
बरेच लोक त्वचेच्या समस्येमुळे ग्रस्त असतात. बऱ्याचदा अनेक प्रॉडक्ट्स वापरून देखील हे चेहऱ्यावरील डाग जात नाही. अशावेळी तुम्ही संत्र्याचा उपयोग करू शकता. संत्र्याचा रस नियमितपणे लावल्याने डाग, मुरूमाचे व्रण आणि त्वचेवरील टॅन कमी होतो.
त्वचा उजळते
संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्चे गुणधर्म असतात. जे त्वचेवरील डाग कमी करते तसेच त्वचा देखील उजळते.
डिहायड्रेशन कमी करते
थंडीच्या दिवसात देखील डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. अशावेळी तुम्ही संत्री खाऊ शकता. संत्र्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या दूर होईल.
डेड स्किन सेल्स
त्वचेवरील डेड स्किन सेल्स कमी करण्यासाठी संत्री खूप उपयुक्त आहे. संत्र्याच्या सालीचा स्क्रब त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यास मदत करते.
ग्लोइंग स्किनसाठी संत्र्याचा उपयोग कस करावं
- रोजच्या आहारात तुम्ही संत्र्याचा उपयोग करू शकता.
- संत्र्याचा ताजा रस तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.
- आठवड्यातून 2-3 वेळा वापरल्यास त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळेल.
हेही वाचा : Beauty Tips : या घरगुती उपायांनी ओपन पोर्सची समस्या दूर होईल
Edited By : Prachi Manjrekar